नगर वाचनालयासमोरील अतिक्रमण काढले

By admin | Published: June 19, 2016 12:06 AM2016-06-19T00:06:35+5:302016-06-19T00:06:35+5:30

जोशी मार्केट ते नगर वाचनालयासमोर व्यवसायिकांनी महापालिकेच्या फुटपाथवर व अनधिकृत अतिक्र मण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ...

Encroachment took place outside the city library | नगर वाचनालयासमोरील अतिक्रमण काढले

नगर वाचनालयासमोरील अतिक्रमण काढले

Next

आयुक्तांनी घेतली दखल : महापालिकेची कारवाई
अमरावती : जोशी मार्केट ते नगर वाचनालयासमोर व्यवसायिकांनी महापालिकेच्या फुटपाथवर व अनधिकृत अतिक्र मण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी हटविले. महापालिका अधिकाऱ्यांनी २० ते २२ जणांचे कच्चे व पक्की स्वरुपाची तट्टे मंडप व खोके काढले. या ठिकाणी काहींनी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. महापालिके च्यावतीने तीन फूट जागा देण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी हे अतिक्रमण काढण्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकाला आदेश दिले होते. त्यावर 'लोकमत'चे वृत्त झळकताच कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही कारवाई अतिक्रमण पथकप्रमुख जी.के. कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई, मजहर हुसैन, बबलू यादव, विनोद गेडाम, गोलू पाल, पोलीस विभागाचे भारत बघेल, किशोर कनोजे, सतीश खंडारे, प्रमोद देशमुख, संजय कोल्हे, आदींनी केली आहे. पथकाने अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचे लोखंडी जाळीचे काऊंटर, बल्ली बासे व इतर साहित्य जप्त केले आहे. कारवाई झाल्यामुळे आता आम्ही व्यवसाय करायचा कुठे, यासंदर्भात काही व्यावसायिक जिल्हधिकाऱ्यांकडे निवेदन घेऊन गेल्याचे समजते.

Web Title: Encroachment took place outside the city library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.