महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:17 PM2017-09-06T23:17:21+5:302017-09-06T23:17:48+5:30

शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे ......

Encroachment by tree trunk on the highway | महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण

महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण

Next
ठळक मुद्देप्रशासन झोपेत : बिच्छन नदीपात्रातही घुसखोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे संतापजनक चित्र असून प्रशासनाची डोळेझाक अतिक्रमणधारकांना पाठबळ देणारी ठरली आहे.
परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात पूर्वीच अतिक्रमण काढण्यावरून प्रशासनाची टोलवाटोलवी, राजकारण्यांची मुकसंमती सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारी ठरली आहे. नजर जाईल तिकडे अतिक्रमणाचा विळखा नियम धाब्यावर बसविणारा ठरला असताना यातून मोठी दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाचे कार्य कुठले यावरच शहरातील चौकामध्ये सुरू असणाºया चर्चा बºयाच बोलक्या ठरल्या आहेत. वाहतुकीचा अडथळा होताच पोलीस प्रशासनावर बोट ठेवले जात असताना अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची असून यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील बैठका वांझोट्या ठरल्या आहेत. रस्त्यांवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गतिरोधक नसल्याने जिवीतहानी नसली तरी धूम स्टाईलने भरधाव दुचाकी दामटणाºयांची दादागिरी सर्रास बघायला मिळते.
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या महत्प्रयासाने शहरात बैतूल स्टॉप ते अचलपूर नाक्यापर्यंत इंदूर-अमरावती महामार्गाचे शहराच्या हद्दीत चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. वाघामाता मंदिरापुढेही अतिक्रमण सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत.
नदीपात्रातही घुसखोरी
अतिक्रमणासाठी वाट्टेल त्या शासकीय जागेवर आपला हक्क दाखविण्याची स्पर्धाच जणू शहरात सुरू आहे. लालपूल परिसरातील धारणी मार्गावर बिच्छन नदीपात्रात थेट घुसण्याचा महाप्रताप करण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमणाचा विळखा अतिक्रमणधारकांसह रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या जिवावर बेतणारा ठरला असताना त्यावर कोण कारवाई करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वृक्ष लागवडीचा फायदा काय ?
राज्यभर दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सामाजिक संस्था एकवटल्या असताना दुसरीकडे दिवसाढवळ्या सुरू असलेली वृक्षतोड पाहता त्यासाठी प्रशासन कुठलीच कारवाही करीत नसल्याने वृक्षतोड करणाºयांचे मनोबल वाढल्याने वृक्षारोपणाचा फायदा काय, असा सवाल आता वृक्षप्रेमी करीत आहे

Web Title: Encroachment by tree trunk on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.