अपूर्ण कालव्यावर गावकऱ्यांचे अतिक्रमण

By admin | Published: April 9, 2015 12:26 AM2015-04-09T00:26:52+5:302015-04-09T00:26:52+5:30

मेळघाटचे दिवंगत नेते रामू पटेल यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेले आणि त्यानंतर मुदतपूर्व तसेच कमी खर्चात तयार झालेले ..

Encroachment of villagers on incomplete canals | अपूर्ण कालव्यावर गावकऱ्यांचे अतिक्रमण

अपूर्ण कालव्यावर गावकऱ्यांचे अतिक्रमण

Next

समस्या : ३५ वर्षांपासूून शेतकऱ्यांची पाण्याकरिता पायपीट
अरुण पटोकार  पथ्रोट
मेळघाटचे दिवंगत नेते रामू पटेल यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेले आणि त्यानंतर मुदतपूर्व तसेच कमी खर्चात तयार झालेले पहिले धरण म्हणजे शहानूर. या धरणाच्या लघुपाट क्र. १ पथ्रोट मायनरचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. स्थानिक बसस्थानकाच्या मागून जाणाऱ्या या कालव्यावर गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने ३५ वर्षांपासून कालव्याचे काम अपूर्ण आहे.
शहानूर धरणाचे मुख्य कालवे पांढरी मायनर, खाडेगाव मायनर, जवळापूर मायनर, रामापूर मायनर हे कालवे धरण झाल्याबरोबर पूर्ण झाले. सध्या या कालव्यांवरील लाभार्थी शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळत आहे. त्यामुळे कालव्यावरील शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र, लघुपाट क्रमांक १ पथ्रोट मायनरचे काम मागील ३५ वर्षांपासून रखडले आहे. या कालव्याचे काम अपूर्ण असून गावकऱ्यांनी येथे अतिक्रमण केल्याने आता कालव्याचे काम करण्यास एडचणी येत आहेत. परिणामी शहानूर धरणाच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकत नाही.
या कालव्याचा सव्वा किलोमीटर लांब व ११ मीटर रूंद परिसर अतिक्रमणाने व्यापला आहे. त्यामुळे १९८१ पासून हा कालवा बंद अवस्थेत आहे. या कालव्याचे पाणी मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी अनेकदा शाखा अभियंता पेढेकर यांच्याकडे मागणी केली. मागणीच्या अनुषंगाने पेढेकर यांनी तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केला. पत्र व्यवहारानुसार तहसीलदारांनी शाखा अभियंत्यांकडे पत्रही दिले. या अनुषंगाने कालव्याच्या दुरूस्तीकरिता अभियंत्यांनी अतिक्रमणधारकांना तेथून स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. मात्र, अभियंत्याला धमकावून जेसीबी परत पाठविला.
या व्यतिरिक्त १९८१ पासून खाडेगाव मायनर, पांढरी मायनर, पथ्रोट मायनर, रामापूर मायनरवर मुरूम नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेकदा मुरूम टाकून कालवा रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी रेटून धरली. मात्र, त्यावेळी निधी उपलब्ध नसल्याने कालवाा रस्ता दुरूस्तीचे काम रखडले. यंदा जलसंपदा विभागांतर्गत लघुपाट क्र. १ पथ्रोट, शेलगाव, ऐवजपूर, पांढरी मायनर, खाडेगाव मायनर, रामापूर मायनर वरच्या कालमव्यावर तेराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पथ्रोट मायनरवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीनुसार तहसीलदारांकडे पत्र दिले. तहसीलदारांनी आवश्यक तो पाठपुरावा करून कालव्यावरील अतिक्रमण हटविण्याचे पत्र दिले. त्यानुसार अतिक्रमणधारकांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी परत पाठविले.
-डी.एन.पेढेकर
शाखा अभियंता, शहानूर प्रकल्प.

Web Title: Encroachment of villagers on incomplete canals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.