अर्जुननगरात अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 12:15 AM2016-01-19T00:15:41+5:302016-01-19T00:15:41+5:30
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अर्जुननगर येथील अतिक्रमित असलेले पंचशील ध्वज हटविण्याची ..
लोकायुक्तांचे आदेश : महापालिकेची सोमवारी पहाटे ५ वाजता कारवाई
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अर्जुननगर येथील अतिक्रमित असलेले पंचशील ध्वज हटविण्याची कारवाई सोमवारी पहाटे वाच वाजताच्या सुमारास महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तात केली. ही कारवाई लोकायुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आली असून या कारवाईला बौद्ध समाज बांधवांनी निषेध केला.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने काही वर्षांपासून अतिक्रमीत असलेले पंचशील ध्वज हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. हा पंचशील ध्वज हटविताना प्रचंड पोलीस ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता यापूर्वीच आयुक्त गुडेवार यांनी पोलीस विभागाला पत्राद्वारे कळविली होती. त्यानुसार गाडगेनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळीे अतिक्रमीत हटविताना हजर होते. लोकायुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने अतिक्रमीत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, जागा निरिक्षक गणेश कुत्तरमारे, मनीष हिरोडे, प्रितम रामटेके यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्तांच्या दालनात महिलांचा ठिय्या
येथील अर्जुननगरातील अतिक्रमीत पंचशील ध्वज हटविण्यात आल्यानंतर परिसरातील महिलांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनात सोमवारी ठिय्या मांडला. एकाच समाजाचे धार्मिक अतिक्रमण हटविण्याबाबत महिलांनी आयुक्तांसोबत चर्चा करताना जाब विचारला. यावेळी नगरसेवक प्रदीप दंदे, दीपक पाटील, सुदाम बोरकर, कैलास मोरे, सुनील गजभिये यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका कारवाईवर संताप व्यक्त केला.