अखेरपर्यंत गजभिये शीतलसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:15 PM2018-03-23T22:15:10+5:302018-03-23T22:15:10+5:30

शीतल पाटील हत्याकांडातील अटक आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये शीतलच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. मात्र, शीतलने आत्महत्या केल्याच्या भूमिकेवर तो ठाम असल्याचे पोलिसांना आढळून आले.

By the end, with the cold Sill | अखेरपर्यंत गजभिये शीतलसोबत

अखेरपर्यंत गजभिये शीतलसोबत

Next
ठळक मुद्देपोलिसांसमक्ष कबुली : आरोपीला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील अटक आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये शीतलच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. मात्र, शीतलने आत्महत्या केल्याच्या भूमिकेवर तो ठाम असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याला न्यायालयात २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रानुसार, प्रकरणातील दुसरा आरोपी रहमान खां पठाण (३५, रा. ताजनगर) याच्या शोध पोलीस पथक घेत आहे. गुरुवारी सुनील गजभियेने न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आल्यावर त्याने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. दीड वर्षांपासून शीतलसोबत त्याचा वाद होता. तो विकोपाला गेला होता. १३ मार्च रोजी शीतल व रहमानला कार (एमएच २७ एसी-६९४८) मध्ये घेऊन तो चांदूरबाजार रोडवर गेला होता. शीतल व रहमानने एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यावेळी गजभिये हा काही कामानिमित्त अर्धा तास दोघांपासून दूर गेला होता. परतल्यानंतर तिघेही कठोरा मार्ग एक्स्प्रेस हायवेवर पोहोचले. दरम्यान, शीतलसोबत गजभियेची वादावादी सुरूच होता. त्यानंतर एक्स्प्रेस हायवेवरील रस्त्यावर कार थांबविल्यानंतर शीतलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे गजभिये बयाण दिले. शवविच्छेदन अहवालात मात्र तिचा मृत्यू डोक्याच्या आत मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न होत आहे. तिची हत्या करून फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांचा आहे. चौकशीदरम्यान त्याला पोलिसांनी घटनास्थळी नेले होते.
आश्रय देणारा अटकेत
सुनील गजभिये हा रविनगरातील घरी असताना १७ मार्च रोजी सकाळी त्याला गडचिरोली येथील बी अ‍ॅन्ड सीचा क्लर्क शिवदास गोंडाणे न्यायालयीन खटल्यासंदर्भात भेटण्यासाठी आला. त्यानंतर ते दोघे कारमध्ये बसून गडचिरोलीला गेले. तेथे गोंडाणे याने गजभियेच्या पत्नीच्या खात्यात चार लाख जमा केले. गजभियेला आश्रय दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. गजभियेच्या पत्नीच्या खात्याची चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.
रात्री दीडच्या सुमारास हत्या
१३ मार्च रोजी सायंकाळी शीतल व गजभिये इर्विन चौकात दिसले. त्यानंतर शीतलच्या मोबाइलवर १०.२० वाजता आईचा कॉल आला. त्यानंतर मोबाइल बंद झाला. ११ वाजता शीतल, रहमान यांनी चांदुरबाजार रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तिघेही अमरावतीच्या दिशेने निघाले. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास शीतलची हत्या झाल्याची शक्यता गाडगेनगर पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र, प्रवासादरम्यान काय झाले, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

न्यायालयाने गजभियेला २८ पर्यंत कोठडी सुनावली. शीतलने आत्महत्या केल्याचे गजभिये सांगत आहे. दुसरा आरोपी हाती लागल्यावर या हत्येचा उलगडा होऊ शकतो.
- मनीष ठाकरे
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

गजभिये व शीतल यांच्यात वाद सुरू होते. मात्र, नेमके काय झाले, तिची हत्या कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चौकशीनंतर हत्येचा उलगडा होईल.
- दत्तात्रय मंडलिक
पोलीस आयुक्त.

Web Title: By the end, with the cold Sill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.