कर्जमाफीची वर्षपूर्ती, ७६ हजार शेतकरी प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:03 PM2018-06-22T23:03:15+5:302018-06-22T23:03:44+5:30

At the end of the loan waiver, 76 thousand farmers are waiting | कर्जमाफीची वर्षपूर्ती, ७६ हजार शेतकरी प्रतीक्षेतच

कर्जमाफीची वर्षपूर्ती, ७६ हजार शेतकरी प्रतीक्षेतच

Next
ठळक मुद्देग्रीन लिस्टचा घोळ कायम : पात्र शेतकऱ्यांची नावे पडताळणीच्या फेऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्जमाफीसाठी १ लाख ९७ हजार ६१३ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज केलेत. प्रत्यक्षात १ लाख २१ हजार २५५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. सद्यस्थितीत दहावी 'ग्रीन लिस्ट' पडताळणीला आली. सहकार सूत्रांच्या अंदाजानुसार ही अखेरचीच यादी असल्याने कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणारे ७६ हजार ४५८ शेतकरी वंचित राहतील, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे अल्प व मध्यम मुदती कर्ज माफ करण्याचा निर्णय २८ जून २०१७ ला घेतला. यामध्ये ज्या शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले. अशा शेतकऱ्यांना नियमांच्या अधीन राहून व ज्यांनी नियमित भरणा केला, त्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. यासाठी २८ जून, ५ जुलै, २० जुलै व ८ सप्टेंबर २०१७ व त्यानंतर डझनावर शासनादेश निर्गमित केलेत. कर्जमाफीसाठी २३ सप्टेंबर २०१७ पर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज मागविले. यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले. या अर्जाची व बँकाच्या याद्यांची पडताळणी लेखापरीक्षकांनी करून १ ते ६६ कॉलमची माहिती अपलोड करण्यात आली. आतापर्यंत दहा याद्या पडताळणीला आल्यात. यापैकी नवव्या यादीत तांत्रिक दोष असल्याने ती रद्द करण्यात आली. या याद्यांचा घोळ अद्यापही निपटलेला नाही, हेच वास्तव आहे.
नवव्या ग्रीन लिस्टची पडताळणी सुरू
जिल्ह्यात यापूर्वी सात ग्रीन लिस्ट आल्यात. त्यानंतर आठवी लिस्ट रद्द झाल्याने नववी लिस्ट या आठवड्यात आली. यामध्ये २५ हजार खातेदारांचा समावेश आहे. जिल्हा बँकेचे ४,९२२ खातेदार आहेत. यापैकी ४,३२७ खातेदार पडताळणीअंती पात्र झाले आहेत. कमर्शियल बँकांच्या २० हजार खातेदारांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये थकबाकीदार, प्रोत्साहनपर खातेदारांचा समावेश आहे.
याद्या बँकांत लागणार
अनेक खातेदारांना कर्जमाफीविषयीची माहितीच नाही. बँका माहिती देत नाहीत. पोर्टलवर नावे नाहीत. त्यामुळे या आठवड्यात ग्रामसेवक तलाठी, तहसीलदार, सहायक निबंधक व संबंधित बँकांमध्ये आजवर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याद्वारे कर्जमाफीचा लाभ मिळाला की नाही याची त्वरित माहिती मिळणार आहे.

Web Title: At the end of the loan waiver, 76 thousand farmers are waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.