अखेर ती महिला कुटूंबीयच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:16+5:30

नमाय उर्फ सुशीला रामराव सेलुकर (४४, रा. गंगाधरी, ता.चिखलदरा, पोलीस स्टेशन पथ्रोट) ही मनोरुग्ण महिला तीन वर्षापूर्वी घरुन निघुन गेली होती. तीन वर्ष लोटल्यामुळे सर्वांनी तिच्या परतण्याची आशा सोडली होती. ती मनोरुग्ण महिला भटकंती करित छत्तीसगड बिलासपूरपर्यंत पोहचली. तेथील प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला बिलासपूर-सेंदरी येथील राज्य मानसिक स्वास्थ चिकित्सालयात दाखल केले. यात तिला आधार मिळाला. ती बरी झाली.

In the end, the woman was handed over to her family | अखेर ती महिला कुटूंबीयच्या स्वाधीन

अखेर ती महिला कुटूंबीयच्या स्वाधीन

Next
ठळक मुद्देप्रयत्नांना यश : तीन वर्षापूर्वी मेळघाटातून हरवली, छत्तीसगढ-बिलासपूरला मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटातील गंगाधरी येथून हरवलेल्या त्या आदिवासी महिलेला अखेर तीन वर्षानंतर तीचे कुटूंबीय मिळालेत. तिला बघून तिचे नातवंड, कुटुंबियांन्सह गावकयांचे डोळे पाणावलेत.
नमाय उर्फ सुशीला रामराव सेलुकर (४४, रा. गंगाधरी, ता.चिखलदरा, पोलीस स्टेशन पथ्रोट) ही मनोरुग्ण महिला तीन वर्षापूर्वी घरुन निघुन गेली होती. तीन वर्ष लोटल्यामुळे सर्वांनी तिच्या परतण्याची आशा सोडली होती. ती मनोरुग्ण महिला भटकंती करित छत्तीसगड बिलासपूरपर्यंत पोहचली. तेथील प्रशासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला बिलासपूर-सेंदरी येथील राज्य मानसिक स्वास्थ चिकित्सालयात दाखल केले. यात तिला आधार मिळाला. ती बरी झाली. आपले नाव, गाव, घर व कुटुंबियांबाबत तिने तेथील प्रशासनाला माहिती दिली. बिलासपूर-छत्तीसगड पोलिसांनी नमायची माहिती पथ्रोट पोलिसांना दिली. पोलिसांनी ती माहिती नमायच्या कुटुंबीयांना दिली. हरवलेली नमाय मिळाली, हे समजताच कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही बाब मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे व यशवंत काळे या पितापुत्रांना कळली. केवलराम काळे व प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी या अनुषंगाने बिलासपूर प्रशासनासह पोलिसांशी संपर्क झाला. बिलासपूर प्रशासनाने नमायसह तिच्या कुटुंबियांचे आधार कार्ड, ओळखपत्र मागवले आणि अखेर प्रयत्नांना यश येऊन मंगळवार १३ ऑक्टोबरला बिलासपूर पोलीस प्रशासनाच्या आदेशासह नमायला घेवून बडनेरा रेल्वे स्टेशनवर दाखल झालेत.

भावपूर्ण प्रसंग, ओळख परेड
नमायला घेण्याकरिता नमायचा पती रामराव सेलूकर (रा.गंगारखेडा) व भाऊ मंसाराम ठाकरे (रा.सोमवारखेडा) यांना सोबत घेवून यशवंत काळे स्वत:च्या वाहनाने बडनेरा रेल्वे स्टेशनवर १३ ऑक्टोबरला हजर झालेत. तेव्हा रेल्वे स्टेशनवरच नमायने, बिलासपूर पोलीसांसमक्ष आपल्या कुटुंबीयांना नावानी ओळखले. यात खात्री पटल्यावर बिलासपूर पोलिसांनी नमायला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. ती आपल्या मुळगावी गंगाधरीला दाखल झाली.

Web Title: In the end, the woman was handed over to her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.