अभियंता सहकारी पतसंस्थेकडून पावसाने निराधार केलेल्या कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:56+5:302021-09-17T04:16:56+5:30

अभियंता दिन, वादळामुळे घरातील साहित्य चिखलात अंजनगाव सुर्जी : स्थानिक बारगणपुरा येथील द्वारकाबाई वासुदेव ओळंबे यांचे राहते घर ...

Engineer Co-operative Credit Society helps families affected by rains | अभियंता सहकारी पतसंस्थेकडून पावसाने निराधार केलेल्या कुटुंबाला मदत

अभियंता सहकारी पतसंस्थेकडून पावसाने निराधार केलेल्या कुटुंबाला मदत

Next

अभियंता दिन, वादळामुळे घरातील साहित्य चिखलात

अंजनगाव सुर्जी : स्थानिक बारगणपुरा येथील द्वारकाबाई वासुदेव ओळंबे यांचे राहते घर दोन दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे कोलमडून सर्व साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या कुटुंबाला अभियंता दिनाचे औचित्य साधून अभियंता सहकारी पतसंस्थेकडून या कुटुंबाला मदत करण्यात आली.

बँडवादनाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या ओळंबे कुटुंबाला वादळी पावसाचा फटका बसला. वादळी पावसामुळे त्यांचे राहते घर पडून सर्व साहित्य हे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. कोरोना महामारीमुळे द्वारकाबाईंची दोन्ही मुले बेरोजगार आहेत. त्यातच या नुकसानाने खाण्यापिण्याचे संपूर्ण साहित्य नेस्तनाबूत झाले. या घटनेची माहिती मिळताच महवितरणचे अभियंता संदीप गुजर यांनी त्यांच्या सबऑर्डिनेट असोसिएशन पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांना दिली. त्यांनी पतसंस्थेमार्फत १० हजारांची मदत दिली. यातून ओळंबे कुटुंबाला जीवनावश्यक भांडी, किराणा, ब्लँकेट, सतरंजी व रोख तीन हजार रुपये अशी मदत देण्यात आली.

Web Title: Engineer Co-operative Credit Society helps families affected by rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.