अभियांत्रिकी सेवा महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By Admin | Published: March 25, 2015 12:18 AM2015-03-25T00:18:19+5:302015-03-25T00:18:19+5:30

जिल्ह्यात विविध यंत्रणामध्ये काम करीत असलेल्या अभियंत्यावर दिवसेंदिवस अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याने काही दिवसापूर्वी दत्तापुर येथील...

Engineering Service Federation's District Caucheryar Morcha | अभियांत्रिकी सेवा महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

अभियांत्रिकी सेवा महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

googlenewsNext

अमरावती : जिल्ह्यात विविध यंत्रणामध्ये काम करीत असलेल्या अभियंत्यावर दिवसेंदिवस अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याने काही दिवसापूर्वी दत्तापुर येथील अभियंता गणेश कोल्हे यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण कमी करूण भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी मंगळवारी अभियांत्रिकी सेवा महासंघाचा जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करण्यात आलेश्र
जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना त्याच्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त इतर अतिरिक्त कामांचा तणाव वाढल्याने अस्वस्था पसरली आहे.अशातच विभागाची सर्व कामे करून स्ध्दा जलयुक्त शिवार व विहिरींच्या कामात विलंब झाल्यास पगार रोखण्याच्या व निलंबित कारवाई धसक्याने क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अभियंत्यामध्ये कमालीचे नैराश्य आले आहे. त्यामुळे भविष्यात अश्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे जलसंपदा, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागात अभियत्यांची पदे रिक्त आहेत. अशातच विभागात अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाची जबाबदारी देण्यात येवू नये रिक्त पदे भरावीत. अशा विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढून अतिरिक्त कामाच्या ताण देण्याच्या प्रकाराच्या कृ तीचा तिव्र निषेध केला आहे. यावेळी अरविंद गावंडे, लांडेकर, सुरेश नांदगावकर, संजय व्यवहारे, राठी व अभियंते उपस्थित होते.

Web Title: Engineering Service Federation's District Caucheryar Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.