अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:08+5:302021-01-14T04:12:08+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने हिवाळी २०२० ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने हिवाळी २०२० परीक्षांचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारले जात आहेत. १६ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज स्वीकारले जातील, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
हिवाळी २०२० परीक्षेकरिता बी.ई., बी.टेक., बी.टेक्स. आणि बी.आर्च. या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. बी.ई., बी.टेक., बी.टेक्स. सेमिस्टर ५ , ७ व बी.आर्च. सेमिस्टर ३, ५, ७ आणि ९ या परीक्षेकरिता नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे तसेच बी.ई., बी.टेक., बी.टेक्स. सेमिस्टर ७ ,८ व बी.आर्च. सेमिस्टर ९ आणि १० या परीक्षेकरिता माजी विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १६ जानेवारी, २०२१ आहे. २३ जानेवारीपर्यंत रुपये ५० विलंब शुल्कासह स्वीकारण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
----------------------
२८ जानेवारीपर्यंत परीक्षा फाॅर्म सादर करणे अनिवार्य
विद्यार्थ्यांना परीक्षा फाॅर्म हे महाविद्यालयात जमा करावे लागेल. महाविद्यालयांनी ऑनलाईन पोर्टलवर लॉगिनद्वारे २७ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी भरलेली आवेदनपत्रे तपासणी अनिवार्यपणे करायची आहे. ते २८ जानेवारी रोजी विद्यापीठात सर्व आवेदनपत्रे न चुकता सादर करावी लागेल. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क शक्यतोवर रोख स्वरूपात घ्यावे. किंबहुना ऑनलाईन पावतीची पडताळणी करून ती प्रमाणित करून घेण्याच्या सूचना आहे.
------------------------
अभियांत्रिकीच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होतील. त्यानुसार परीक्षा फाॅर्म स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारीपर्यंत परीक्षा फाॅर्म विद्यापीठात सादर करणे अनिवार्य आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ