सखींनी घेतला फराळ स्पर्धेचा आनंद
By admin | Published: November 24, 2015 12:23 AM2015-11-24T00:23:36+5:302015-11-24T00:23:36+5:30
महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी लोकमत सखीमंच नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते.
‘कुकरी शो’देखील रंगला : घरकूल मसाले, सखी मंचचे आयोजन
अमरावती : महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी लोकमत सखीमंच नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते. याचाच एक भाग म्हणून सखींसाठी दीपावली फराळ स्पर्धा व कुकरी 'शो' व फराळ स्पर्धा येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी पार पडली.
सखीमंच व घरकूल मसालेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. यामध्ये सखींनी एकापेक्षा एक पदार्थ तयार करून आणले होते. या पदार्थांची सजावट कलात्मकतेने करण्यात आली. स्पर्धेत गोड पदार्थांच्या गटात आरती मकवाना यांनी तयार केलेल्या चिरवंटाला प्रथम तर द्वितीय क्रमांक सीमा गोरांडे यांनी पटकावला. खाऱ्या पदार्थांमध्ये वंदना मालपे यांनी तयार केलेल्या चकलीला प्रथम तर अर्चना एरंडे यांच्या खाऱ्या पापडीने द्वितीय क्रमांक पटकावला.
‘कुकरी शो’मध्ये शेफ समीर दामले यांनी सखींना रेस्टॉरेंट स्टाईल भाज्या, सूप, स्नॅक्स आदींचे विविध प्रकार शिकवले. सखींनी या सर्व पदार्थांची चव घेऊन समीर दामले यांना विविध प्रश्न विचारले. त्यांच्याकडून हेल्थ टिप्सदेखील घेतल्यात. कार्यक्रमात सहभागी सखींना घरकूल मसालेतर्फे मसाल्यांची पाकिटे देण्यात आलीत. याच कार्यक्रमात युनियन एजन्सीकडून सखीमंच सदस्या नोंदणी अंतर्गत देण्यात आलेल्या मोबाईल सेटचा लकी ड्रॉ देखील दीपा अग्रवाल यांच्या हस्ते काढण्यात आला. यामध्ये ज्योती शेंदुरजने (सदस्य क्र.-०३५९५९), वर्षा राऊत (सदस्य क्र.-०३९८८०), प्रगती ढोले (०३८०७९), भाग्यश्री रेवस्कर (०४१९०३), यांनी बक्षिसे पटकावली.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शीतल मेटकर व दीपा अग्रवाल उपस्थित होत्या. संचालन आरती देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी रंजना वाघ, रोहिणी कुंटे, भारती दातेराव, विद्या सरोदे, नंदा वाघमारे, करूणा नाशिककर, माधुरी बोकरिया, अरूणा इंगोले, संगीता अजमिरे आदींनी प्रयत्न केलेत.