सखींनी घेतला श्रावण सोहळा कॉमेडी मेळ्याचा आनंद

By admin | Published: August 24, 2015 12:32 AM2015-08-24T00:32:28+5:302015-08-24T00:32:28+5:30

श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा पवित्र महिना. कुमारिकेपासून तर सुवासिनींच्या आवडीचा तसेच नवविवाहितेपासून....

Enjoy the Shravan Ceremony Comedy Gala by Sakhi | सखींनी घेतला श्रावण सोहळा कॉमेडी मेळ्याचा आनंद

सखींनी घेतला श्रावण सोहळा कॉमेडी मेळ्याचा आनंद

Next

कलर्स चॅनल प्रस्तुत : अमरावतीतील सखींचा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग
अमरावती : श्रावण महिना म्हणजे सणवार व्रतवैकल्याचा पवित्र महिना. कुमारिकेपासून तर सुवासिनींच्या आवडीचा तसेच नवविवाहितेपासून तर माहेरवासीयांच्या मनात कायम पिंगा घालणारा हा महिना उत्साह आणि पावित्र्याचा सुरेख मेळ घडवून आणणारा आहे. मंगळागौर, गौरी गणपती, श्रावण सोमवार, नागपंचमी, हरितालिका आदी सणांची तयारी घराघरांत केली जातात. या उत्सवातील आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी खास श्रावण सोहळ्याचे आयोजन अमरावती सखी मंचने नुकतेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे दीप प्रज्ज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मेडिमिक्सचे टेरीटेरी सेल्स मॅनेजर संजय देशमुख, बिरला सन्सचे शाखा व्यवस्थापक योगेश पनबुडे, मोकलकर क्लासेस रीता मोकलकर, सेन्ट फ्रान्सीस स्कूलच्या प्राचार्य उज्ज्वला कुळकर्णी, नगरसेविका अर्चना इंगोले, अपर्णा देशमुख, परतवाडा, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, व्यवस्थापक देवेंन्द्र ठाकरे, व्यवस्थापक राजेश मालधुरे उपस्थित होते.
श्रावण सोहळा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सखींसाठी विनोदी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. सखींनी एकापेक्षा एक सरस उखाणे म्हणून उपस्थितांमध्ये हास्य फुलविले. प्रथम क्रमांक अर्चना सपकाळ, द्वितीय अर्चना एरंडे, तृतीय माधुरी बोकारीया, चतुर्थ सुनीता डोंगरे, तर पाचवा क्रमांक लता जाधव यांनी पटकावला, कलर्स विनोदी उखाणे स्पर्धेत स्पर्धकांना बसण्यासाठी महाराजा खुर्चीचे आयोजन केले होते. कलर्स प्रस्तुत राखी थाळी सजावट व आपल्या भावाबद्दलचा हा प्रेमाचा धागा त्यांनी आणखी दृढ केला. राखी थाळी सजावटमध्ये प्रथम बक्षीस सुनीता डोंगरे तर द्वितीय बक्षीस मीना विधे यांनी पटकाविले. रांगोळी स्पर्धेत सखींनी निसर्ग चित्रास प्राधान्य दिले. विविध नैसर्गिक देखावे सखींनी रांगोळीतून साकारलीत. काहींनी मात्र स्त्री सुरक्षितता व सामाजिक विषयही रांगोळीतून साकारले. स्पर्धेच्या या शृंखलांमध्ये मेहेंदी स्पर्धासुद्धा घेण्यात आली. त्यामध्ये रेणुका गुडधे हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले, स्नेहा सोजवानी हिने द्वितीय पारितोषिक पटकावले. ईन्होवेटीव्ह मेडिमिक्स हर्बल फॅशन शोमध्ये एकापेक्षा एक सरस वेशभूषा करुन सखींनी पे्रक्षकांची मने जिंकलीत, निर्सगातील पाने, फुले, विविध कळ्यांनी युक्त असा फॅशन शो करुन सखींनी रसिकांना जाणीव करुन दिली. सखींनी पारंपरिक वेशभूषा व श्रावणाचा हिरव्या रंगछटेच्या पोशाखावर अधिक भर दिला. यामध्ये नेहा वैद्य हिला प्रथम क्रमांक तर प्रीती गवई यांना दुसरे बक्षीस प्राप्त झाले. फॅशन शो कोरीओग्राफर किरण भेले यांनी केला.
यावेळी सखींसाठी वन मिनिट गेम शो स्पर्धेचे आयोजन केले होते. सखींनी विविध बक्षिसे पटकावली. कार्यक्रमाचे परीक्षक उज्ज्वला कुळकर्णी, रंजना लोकरीया, अश्विनी मेश्राम, अपर्णा देशमुख, रीता मोकलकर, जया पुंडकर व अमरीश तबस्सूम होत्या. यावेळी बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. श्रावण सरींच्या रिमझिम बरसातीत मंद श्रावण गीतांचा आस्वाद घेत सखींनी झुल्याचा मनमुराद आनंद लुटला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्याला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कलर्स व मेडिमिक्सचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन अमरावती सखी संयोजिका स्वाती बडगुजर यांनी केले.

Web Title: Enjoy the Shravan Ceremony Comedy Gala by Sakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.