वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती समृद्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:58+5:302021-03-22T04:11:58+5:30
पालकमंत्री, टाकरखेडा संभू येथे वाचनालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण टाकरखेडा संभू : वाचन ही एक संस्कृती असून, वाचनालयाच्या माध्यमातून ही ...
पालकमंत्री, टाकरखेडा संभू येथे वाचनालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
टाकरखेडा संभू : वाचन ही एक संस्कृती असून, वाचनालयाच्या माध्यमातून ही संस्कृती समृद्ध होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.
टाकरखेडा संभू येथील श्री संत राजेश्वर महाराज वाचनालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, माजी सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य जयंत देशमुख, काँग्रेसचे तालुकाप्रमुख मुकद्दरखाँ पठाण, हरिभाऊ मोहोड, सरपंच रश्मी देशमुख, उपसरपंच तथा वाचनालयाचे सचिव प्रदीप शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाचनालयाच्या या नवीन इमारतीकरिता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निधीतून सात लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. वाचनालयाच्यावतीने ग्रंथपाल विद्या शेंडे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष नीता शेंडे, संचालक अशोक मेश्राम, दीपक पाटील, प्रशांत काळे, संतोष शेंडे, नितीन फरकुंडे, अशोक शेंडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप मस्के, सोनाली जामठे, प्रीती पाटील, प्रवीण कुमरे, अविनाश तायडे, दीपाली गुल्हाने, सुप्रिया बांबोळे, शिल्पा लांडगे आदी उपस्थित होते.