भावी पिढीत सायकल संस्कृती रुजवण्यासाठी सायकलिंग स्पर्धा, ३०० हून अधिक स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 11:08 AM2023-01-08T11:08:30+5:302023-01-08T11:10:15+5:30
सकाळी ६.३० वाजता झाली सुरुवात. तीनशे पेक्षा जास्त स्पर्धकानीं घेतला सहभाग
मनिष तसरे
अमरावती - भावी पिढीमध्ये सायकल कल्चर रुजाव व आपली फिटनेस राहावी या साठी अमरावती येथे सायकलिंग स्पर्धेचा आयोजन करण्यात आले असून खुल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेला सकाळीच सुरुवात झाली आहे. या स्पर्धेला स्पर्धकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत 300 पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला. सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली.
अमरावतीमध्ये खुल्या सायकल स्पर्धेचे आयोजन अमरावती सायकलिंग असोसिएशन आणि इतर शासकीय व स्वयंसेवी संस्था तसेच क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच करण्यात आले आहे. ही स्पर्धा 40 किलोमीटर, 25 किलोमीटर ,17 किलोमीटर व 12 किलोमीटरच्या या चार टप्प्यात होत असून यामध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना प्रथम पुरस्कार 5000 रुपये द्वितीय पुरस्कार 3000 रुपये तृतीय पुरस्कार 2000 रुपये व प्रत्येक फिनिशरला मेडल देऊन व पहिल्या 30 स्पर्धकांना हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रवीण खानपासोडे यांनी दिली.