संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:55 PM2018-11-02T21:55:57+5:302018-11-02T21:56:17+5:30

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील १४ पैकी केवळ पाच तालुके आहेत. इतरही नऊ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांनी शुक्रवारी स्थायी समितीत मांडला. हा ठराव गटनेता बबलू देशमुख व इतर सदस्यांनी एकमताने पारित केला.

The entire district will be declared as drought-hit | संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी समितीत ठराव पारित, सर्व तालुक्यांमध्ये गंभीर स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील १४ पैकी केवळ पाच तालुके आहेत. इतरही नऊ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्य सुनील डिके यांनी शुक्रवारी स्थायी समितीत मांडला. हा ठराव गटनेता बबलू देशमुख व इतर सदस्यांनी एकमताने पारित केला. सदर ठराव शासनाकडे पाठविला जाणार आहे.
शासनामार्फत राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, मोर्शी आणि वरूड या पाच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, दर्यापूर, भातकुली, अमरावती, चांदूर बाजार, धारणी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा अशा नऊ तालुक्यांमध्ये पर्जनमान्य कमी आहे. येथे पिकांचे नुकसान आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्येदेखील शासनाने दूष्काळ जाहीर करावा, असा प्रस्ताव सदस्य सुनील डिके यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीत मांडला. त्याला सर्व पदाधिकारी व सदस्यांनी समर्थन देत ठराव मंजूर करून घेतला. तो शासनाकडे पाठविला जातात आहे. यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, सुशीला कुुकडे, वनिता पाल, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंह गैलवार, सुहासिनी ढेपे, प्रियंका दगडकर आदींनी अनुमोदन दिले.

Web Title: The entire district will be declared as drought-hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.