पूर्णा प्रकल्पाची नऊ दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:00 AM2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:02+5:30
मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पूर्णा प्रकल्पाचे संपूर्ण नऊ दरवाजे २० सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. यामधून १५४ घनमिटर प्रतिसेकंद क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा प्रकल्पालगतच्या भागात ३६ तासापासून पावसाने जोर वाढला असल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे सर्व नऊ दरवाजे २० सेंटिमिटरने उघडण्यात आली आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पूर्णा प्रकल्पाचे संपूर्ण नऊ दरवाजे २० सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. यामधून १५४ घनमिटर प्रतिसेकंद क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने सरासरी पेक्षाही जास्त जलसाठा धरणात शिल्लक आहे. विश्रोळी धरणक्षेत्रातील महसूल मंडळात गेल्या २४ तासात सावलमेंढा ८३ मिमी, भैसदेही १६० मिमी तर विश्रोळी येथे ७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तसेच धरणात जिवंत साठा ३०. ०२५५ दलघमी अर्थात ८४.८९ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी ४५०.८१ मीटरपर्यंत वाढली आहे. तालुक्यात पुढील २४ तासात सुद्धा पाऊस जोर धरत असल्याने तसेच धरणात पाण्याचा मोठा जलसाठा झाल्याने धराणातून विसर्ग केला जात आहे. धरणातून सोडलेले पाणी नदीपात्रातच राहणार असून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता अक्षय इरसकर यांनी दिली.
यामुळे कोरोना काळातही पर्यटकांची पावले पुर्णा सिंचन प्रकल्पाकडे वळली आहे. यंदा आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हयातही दमदार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत.