रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’नंतर ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:00 AM2020-12-26T05:00:00+5:302020-12-26T05:01:02+5:30

राज्य आणि राज्याबाहेर ये-जा करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकाहून सर्वाधिक गाड्या धावत आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर कोरोना तपासणी गायब झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना चाचणी होत नसल्याने जिल्ह्यात बाहेर गावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांपासून संसर्गाचा धोका बळावला आहे.

'Entry' after 'thermal screening' of passengers at railway stations | रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’नंतर ‘एन्ट्री’

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’नंतर ‘एन्ट्री’

Next
ठळक मुद्देकोरोना तपासणी पथक गायब, बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशाकडून संक्रमणाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना नवे रूप घेऊन येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्धारावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी आवश्यक आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकावर थातूरमातूर ‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. काही प्रवासी ही चाचणीसुद्धा न करता आवागमन करीत आहे. मात्र, हा सर्व प्रकार रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस उघड्या डोळ्यांनी बघत आहे.
राज्य आणि राज्याबाहेर ये-जा करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकाहून सर्वाधिक गाड्या धावत आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रेल्वे स्थानकावर बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून रेल्वे स्थानकावर कोरोना तपासणी गायब झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच कोरोना चाचणी होत नसल्याने जिल्ह्यात बाहेर गावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांपासून संसर्गाचा धोका बळावला आहे. रेल्वे स्थानकावर महापालिका व मलेरिया विभागाची चमू प्रवाशांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’ करीत आहे. प्रवाशांना दोन ते तीन मिनिटांत तापमान तपासून बाहेरील रस्ता दाखविला जात आहे. परिणामी  कोरोना चाचणी होत नसल्याने रेल्वे प्रवाशांची अलीकडे बल्ले बल्ले आहे.

दोन ते तीन मिनिटांतच प्रवासी मुक्त
रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी होत नाही. त्यामुळे ‘थर्मल स्क्रिनिंग’ होताच दोन ते तीन मिनिटांतच रेल्वे प्रवाशांची तपासणी होऊन ते मुक्त होत असल्याचे वास्तव आहे. कोरोना चाचणीची भानगड नाही. त्यामुळे प्रवाशांचा फारसा वेळ जात नाही. हात किंवा कपाळावर तापमान तपासून पुढे प्रवास करता येत असल्याचे वास्तव आहे.

कोरोना चाचणीसाठी ना टेबल, ना कर्मचारी
अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरील कोरोना चाचणी पथक गायब झाले आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात टेबल ठेवण्यात आला आहे. परंतु, येथे कोरोना चाचणी होत नाही. केवळ ‘थर्मल स्क्रिनिंग’ करुन प्रवाशांना सोडले जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे संसर्ग कसा रोखणार, हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांमार्फत कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: 'Entry' after 'thermal screening' of passengers at railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.