‘त्या’ वाघाची तिवसा तालुक्यात ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:26 AM2018-10-26T01:26:50+5:302018-10-26T01:30:02+5:30

धामणगाव रेल्वे तालुक्यातून नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात त्याने वासराची शिकार केल्याचे गुरुवारी निदर्शनास आले, शिवाय अनकवाडी शिवारात वाघाचे पगमार्क आढळले आहेत.

The 'entry' in Tavasa taluka of 'Tiger' | ‘त्या’ वाघाची तिवसा तालुक्यात ‘एन्ट्री’

‘त्या’ वाघाची तिवसा तालुक्यात ‘एन्ट्री’

Next
ठळक मुद्देरघुनाथपूर शिवारात वासराची शिकाररघुनाथपूर, अनकवाडी शिवारात आढळले पगमार्क, यशोमती ठाकूर घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : धामणगाव रेल्वे तालुक्यातून नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात त्याने वासराची शिकार केल्याचे गुरुवारी निदर्शनास आले, शिवाय अनकवाडी शिवारात वाघाचे पगमार्क आढळले आहेत. दरम्यान, या भागापासून राष्ट्रसंतांचे गुरुकुंज अवघे पाच-सहा किलोमीटरवर असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आ. यशोमती ठाकूर यांनीही गुरुवारी तातडीने घटनास्थळ गाठले.
मागील आठ दिवसांपासून नरभक्षक वाघाने धामणगाव रेल्वे तालुक्यात धुमाकूळ घातला. आधी मंगरूळ दस्तगीर व नंतर अंजनसिंगी येथे माणसांना खाल्लेल्या या वाघाने तिवसा तालुक्यातील कुºहा हद्दीत बुधवारी रात्री प्रवेश केला आणि रघुनाथपूर-भांबोरा पांदण रस्त्यावरील प्रभाकर वानखडे (रा. रघुनाथपूर) यांच्या शेतात झाडाला बांधलेले दोन वर्षांच्या वासराची शिकार केली. ही माहिती वनविभागाला शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी दिली. वनविभाग व तिवसा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनाम्यानंतर आसपासच्या गावांमध्ये ‘अलर्ट’ दिला.
इकडे वाघ, तिकडे बिबट
अनकवाडी व रघुनाथपूर, मालधूर येथे नरभक्षक वाघाने एका वासराची शिकार केल्याने सारी यंत्रणा या ठिकाणी तळ ठोकून बसली होती, तर दुपारी २.१० वाजता वाघ वीरगव्हाण येथे शिरल्याचे फोन खणखणले. काळविटाला ठार केल्याची माहिती मिळताच यंत्रणा तेथे पोहोचली. तथापि, शिकार घेऊन पळ काढणारा तो बिबट असल्याची खात्री करण्यात आली.

शार्प शूटर दाखल
वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी बुलडाणा व अमरावती येथून दोन शार्प शूटर आणण्यात आले आहेत. त्यांना वाघाने केलेल्या शिकारीच्या परिसरात पिंजºयात बसविण्यात आले आहेत.

बंदोबस्त तैनात
वनविभागाचे अधिकारी राजेंद्र बोंडे यांच्या नेतृत्वाखाली ८० अधिकारी व कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत तसेच तिवसा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी घटनास्थळी पोलीस ताफ्यासह बंदोबस्त तैनात केला आहे. तहसीलदार डी.टी. पंधरे हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: The 'entry' in Tavasa taluka of 'Tiger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ