कार्यकारी अभियंत्याच्या दालनात गणेशमूर्तीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:59 PM2018-08-24T21:59:44+5:302018-08-24T22:00:10+5:30

शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व अपूर्ण राहिलेले कामे तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या दालनात गणपतीची मुर्ती स्थापना करून शुक्रवारी युवा सेनेने अभिनव आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत मूर्ती आणून त्याची विधिवत पूजा करून चक्क कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ते बसविल्याने एकच खळबळ उडाली.

Establishment of Ganesh idol in the executive engineer's room | कार्यकारी अभियंत्याच्या दालनात गणेशमूर्तीची स्थापना

कार्यकारी अभियंत्याच्या दालनात गणेशमूर्तीची स्थापना

Next
ठळक मुद्देयुवा सेनेचे अभिनव आंदोलन : कामे अर्धवट, खड्डे बुजविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व अपूर्ण राहिलेले कामे तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या दालनात गणपतीची मुर्ती स्थापना करून शुक्रवारी युवा सेनेने अभिनव आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत मूर्ती आणून त्याची विधिवत पूजा करून चक्क कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ते बसविल्याने एकच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागात शिरले. शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते करण्यासाठी अनेक ठिकाणी चांगले रस्ते उखडून नवीन रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. नवीन कामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजनशून्य असल्याचा आरोप युवा सेनेचे माटोडे यांनी केला. गणेश चतुर्थी दोन आठवड्यावर येऊन ठेपल्याने गणपतीची नागरिकांना व गणेश मंडळांना मूर्ती नेताना शहरातील मार्गावरील खड्यांमुळे व्यत्यय येऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रस्त्यांची कामे तातडीने करण्यात यावे, अशी भूमिका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागावर धडकले होते. आंदोलनाची आक्रमकता पाहता, गाडगेनगर पोलीस कार्यकारी अभियंत्याच्या दालनात दाखल झाले होते. परंतु, कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने त्यांनी येथील महिला अभियंत्यांना निवेदन सादर केले. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व नवीन कामांमध्ये होत असलेली दिरंगाई व कंत्राटदारांचा मनमानी कारभार थांबविण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. कार्यकारी अभियंत्यांना गणपती बाप्पांनी सद्बुद्धी द्यावी, अन्यथा यानंतर शिवसेना स्टाइलने उत्तर देण्यात येणार असल्याचा इशाराही माटोडे यांनी दिला. शहरातील अमरावती बडनेरा मार्ग, सायंस्कोर मैदानावर रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने युवा सेनेचे पदाधिकारी संतापले होते.
शैलेसिंग चव्हाण, सुभाष मसदकर, सतीश ठाकूर, अजय शिरसाठ, नरेश नावंदर, राजा शिरसाठ, कर्तिक गजभिये, बंडू गोकुलकर, प्रवीण वाकेकर, अमित गोटे, मिथून सोळुंके, मनोज करडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची आंदोलनात उपस्थिती होती.

Web Title: Establishment of Ganesh idol in the executive engineer's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.