खापर्डे वाड्यात ‘श्रीं’च्या चांदीच्या पादुकांची स्थापना

By admin | Published: March 2, 2016 12:46 AM2016-03-02T00:46:03+5:302016-03-02T00:46:03+5:30

श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याला संत गजानन महाराजांचा ...

Establishment of Shree's silver footwear in Khaparda Wadas | खापर्डे वाड्यात ‘श्रीं’च्या चांदीच्या पादुकांची स्थापना

खापर्डे वाड्यात ‘श्रीं’च्या चांदीच्या पादुकांची स्थापना

Next

भक्तांची मांदियाळी : ‘तो’ चौरंगही आणला, रवी राणांनी केली महाआरती
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याला संत गजानन महाराजांचा पदस्पर्श लाभल्याचे कर्णोपकर्णी होताच या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. मंगळवारी प्रगट दिनाची पर्वणी साधून या पावन स्थळावर महाराजांच्या ३२५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. या पादुकांना शेगावच्या समाधीचा स्पर्श करून आणला आहे. दादासाहेब खापर्डे हयात असताना ज्या चौरंगावर बसवून दादासाहेबांनी सपत्निक संत गजाननाचे पूजन केले होते त्या चौरंगावर या पादुका भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात.
पश्चात आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत हजारो भक्तांनी गजानन महाराजांची महाआरती केली. पश्चात भाविकांना झुनका भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. खापर्डे वाड्यातील ज्या औदुंबराच्या झाडाखाली चौथऱ्यावर गजानन महाराज बसले होते, तेथे फुलांची सुरेख आरास करण्यात आली होती. तेथेच चौरंगावर संत गजानन महाराजांची प्रतिमादेखील ठेवण्यात आली होती.

हजारोंनी घेतला महाप्रसाद
अमरावती : खापर्डे वाड्यात गजाननाच्या पूजेनंतर 'गण गण गणात बोते'चा भक्तांनी जयघोष केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बळ मिळो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले, बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, माजी नगरसेवक बबन रडके, जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, प्रदीप वडनेरे, महापालिकेतील काँग्रेसचे पक्षनेते बबलू शेखावत, माजी नगरसेवक रामकृष्ण भुगूल, राजू परिहार, लक्ष्मी शर्मा, रजनी सोनकर, दिलीप मेहरे, संजय देशमुख, प्रकाश गावंडे, मिलिंद लेंधे, छोटू जाधव, श्याम श्रीवास, मनीष सोनेकर, निशांत चावंडे, नितीन भोंडे, श्याम जुनघरे, सपना श्रीवास, स्मृती लेंधे, अनिल भेरडे, संतोष शर्मा, स्नेहल शर्मा, संदीप चौधरी, मंदा राऊत, सुमन कैथवास, प्रभा रौंदळकर, ज्योती सैरिसे, निर्मला गोसावी, मीरा कोल्हे, शोभा इटके, सोनाली हिरुळकर, प्रियंका भुजाडणे, सुमती ढोके, लता अंबुलकर, कविता भुजाडणे, शुभांगी विरुळकर, पद्माकर गोलाईतकर, रत्ना पाटील, वंदना जामनेकर, शालिनी देवरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Establishment of Shree's silver footwear in Khaparda Wadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.