अनाथ बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:22+5:302021-05-16T04:13:22+5:30

अमरावती : कोविड प्रादुर्भावाच्या काळात, तसेच साथीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हा कृती दल (टास्क ...

Establishment of Task Force for Protection of Orphans | अनाथ बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स स्थापन

अनाथ बालकांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स स्थापन

Next

अमरावती : कोविड प्रादुर्भावाच्या काळात, तसेच साथीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हा कृती दल (टास्क फोर्स) स्थापण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी जारी केला.

कोविड आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्येक जिल्ह्यात दल स्थापन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेतील या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून, तर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.

बॉक्स

दोन्ही पालक बाधित असल्यास माहिती द्यावी

ज्या बालकांचे दोन्ही पालक बाधित आहेत, अशा बालकांची माहिती चाईल्डलाईन क्रमांक १०९८ किंवा हेल्पलाईन क्रमांक ८३०८९९२२२२ व ७४०००१५५१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा बालकांची व्यवस्था महिला व बालविकास विभागाच्या देसाई लेआऊटमधील शासकीय मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, तसेच विजय कॉलनीतील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह येथे किंवा कॅम्प रस्त्यावरील होलिक्रॉस होम फॉर बेबीज येथे करण्यात येणार आहे.

Web Title: Establishment of Task Force for Protection of Orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.