नैतिकमूल्ये जपणे गरजेचे

By admin | Published: February 14, 2016 12:26 AM2016-02-14T00:26:55+5:302016-02-14T00:26:55+5:30

समाजामध्ये बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण व मुख्यता निर्भया घटनेप्रमाणे बाल गुन्हेगारांचे कृत्य याचे उच्चाटन व्हावे तथा बाल गुन्हेगारांना ...

Ethical values ​​need to be preserved | नैतिकमूल्ये जपणे गरजेचे

नैतिकमूल्ये जपणे गरजेचे

Next

एस. एस. दास : विधी महाविद्यालयात मार्गदर्शन सत्र
अमरावती : समाजामध्ये बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण व मुख्यता निर्भया घटनेप्रमाणे बाल गुन्हेगारांचे कृत्य याचे उच्चाटन व्हावे तथा बाल गुन्हेगारांना बाल न्याय मंडळासमोर मिळणारे सहकार्य हे नवीन पिढीच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना वकील झाल्यानंतर त्या प्रती सेवा करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता ‘वकिलांची बाल न्याय मंडळासमोर नैतिक जबाबदारी व विधी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व योगदानाची आवश्यकता’ या विषयावर शनिवारी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. दास, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. एस. ओझा, न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी तथा बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा जे. पी. शिराळे तथा जी. वी. जांगळे-देशपांडे यांनी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बाल अधिनियम तथा निर्भया घटनेनंतर बाल अधिनियमामध्ये जे आमुलाग्र बदल झाले त्या महत्वाच्या बदलांचा व कायद्याचे महत्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ श्रेणी तथा विधी प्राधिकरणाचे सचिव एस. एस. ओझा व न्या. जे. पी. शिराळे व प्राचार्य प्रणय मालवीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पाचडे तर आभार प्रदर्शन निकिता सेवक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश दाभाडे दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Ethical values ​​need to be preserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.