जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:02+5:302021-02-06T04:23:02+5:30

अमरावती, जलयुक्त शिवार योजनेत यापूर्वी झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानुसार काटेकोरपणे कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश ...

Evaluation of watershed works by a third party | जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन

जलयुक्त शिवारच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन

Next

अमरावती, जलयुक्त शिवार योजनेत यापूर्वी झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानुसार काटेकोरपणे कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिले.

कृषी विभागांतील विविध कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, सर्व तालुका कृषी अधिकारी, आत्मा, नाबार्ड आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचा दर्जा व समग्र मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही नवाल यांनी दिल्यात. पाणलोट विकास कार्यक्रमात क्लस्टरनिहाय कामांना गती द्यावी. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत प्रलंबित प्रकरणांचा वेळीच निपटारा करावा. पात्र व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. योग्य माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. प्रकरण प्रलंबित राहू नये. गारपीट व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या भरपाईबाबत वेळीच पूर्तता करावी. पीक विमा योजनेत चांदूर बाजार तालुक्यातील गारपीट नुकसानभरपाई पैसे जमा झाले आहेत, तसेच खरीप हंगामात प्राप्त तीन हजार ऑनलाईन अर्जांनुसार रक्कमही प्राप्त आहे. त्याचे वेळेत वितरण व्हावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

बचत गटांचे जाळे तयार करा

नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजनेत (पोकरा) महिला बचत गटांचे जाळे होऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न व्हावे. त्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमांतून विविध युनिट सुरू करण्यास प्रोत्साहन द्यावे. छोटे युनिट का असेना, पण प्रत्येक ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व आर्थिक सक्षमीकरण होईल, यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

Web Title: Evaluation of watershed works by a third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.