३२ तासानंतरही ‘त्या’ आठ जणांचा शोध लागेना; मदतकार्य युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 08:02 PM2021-09-15T20:02:25+5:302021-09-15T20:02:49+5:30
Amravati News वरूड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून अकरा जण बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळपर्यंत काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वरूड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून अकरा जण बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळपर्यंत काढण्यात आले. यामध्ये नावाड्यासह एक महिला व चिमुकलीचा समावेश होता. अद्याप उर्वरित ११ लोकांचा शोध बचाव पथकाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुणाचाही शोधा लागलेला नव्हता. (Even after 32 hours, 'those' eight people were not found)
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शोध व बचाव पथकाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जिल्हा शोध व बचाव पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची पथके कालपासून शोधकार्य करीत आहेत. पोलिस, तहसीलदार, घोडेस्वार, ग्रामसेवक, तलाठी, मासेमार तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी मदतकार्य करीत आहेत. तसेच स्थानिकांच्या मदतीनेही बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.