शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होवू शकतो चोरीचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:45+5:302021-09-04T04:17:45+5:30

अमरावती/ संदीप मानकरशेजाऱ्याकडून अनाधिकृतपणे वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल तर तो ही ...

Even if electricity is taken from a neighbor, theft can be registered! | शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होवू शकतो चोरीचा गुन्हा!

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होवू शकतो चोरीचा गुन्हा!

Next

अमरावती/ संदीप मानकरशेजाऱ्याकडून अनाधिकृतपणे वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल तर तो ही गुन्हा ठरतो. अशा नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होवू शकते. अशा वीज चोरीचे कामे प्रकरणे दाखल झाली आहेत. अशा कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीही विद्युत नियमांचे उल्लघंन करू नये असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरात १८६८ जणांवर वीज चोरीची कारवाई करण्यात आली आहे. १) महावितरणकडून कलम १२६ अंतर्गत वर्षभरात झालेली कारवाई

प्रकरणे युनिट चोरी दंड वसूली

अमरावत शहर १८ ४५४४४ ८.२५

अमरावी ग्रामीण १८४५ ०.४९४७ ०

अचलपूर ५ ३५७० ०.६७

मोर्शी ० ० ०

एकूण १८६८ ४९११४.४९५ ८.९२

बॉक्स:

कायदा काय सांगतो?

विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ अंतर्गत जर महावितरणने एखाद्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडीत केला असेल तर त्याने शेजाऱ्याकडून वीज घेणे गुन्हा ठरतो. असे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच ज्या कामासाठी वीज घेतली आहे. त्याचा वापर त्या कामासाठी न करता दुसऱ्या कामासाठी केला असेल तर कारवाई केली जाते. मात्र यामध्ये येथे एफआयआर दाखल करण्यात येत नाही.

बॉक्स:

चोरी कळवा दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

जर एखाद्या नागरिकाने त्याला माहिती असणाऱ्या व्यक्तीची वीज चोरी पकडून दिली. तर त्याला वीज चोरीच्या १० टक्के रक्कम महावितरणकडून बक्षीस स्वरूपात दिली जात असल्याची माहिती महावितरणने दिली. मात्र त्या व्यक्तीला वीज चोरीचा फोटो काढून महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.

कोट

शेजाऱ्याकडून वीज घेणे किंवा वीजेचा वापर अन्य कारणासाठी करणे गुन्हा ठरतो. आमचे भरारी पथक आहे. ते कारवाई करतात डिव्हीजननुसार सुद्धा पथके कारवाईसाठी सज्ज आहेत.

पुष्पा चव्हाण मुख्य अभियंता महावितरण अमरावती

Web Title: Even if electricity is taken from a neighbor, theft can be registered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.