अखेर पळसखेड मार्गावरील "त्या" पुलाला बसविण्यात आले कठडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:59+5:302021-06-18T04:09:59+5:30

फलक सुध्दा बसविले मिडीया इम्पॅक्ट लोकमत फोटो पी १७ पळसखेड चांदूर रेल्वे : शहरातून पळसखेड कडे जाणाऱ्या या ...

Eventually, "that" bridge on Palaskhed road was paved | अखेर पळसखेड मार्गावरील "त्या" पुलाला बसविण्यात आले कठडे

अखेर पळसखेड मार्गावरील "त्या" पुलाला बसविण्यात आले कठडे

Next

फलक सुध्दा बसविले

मिडीया इम्पॅक्ट लोकमत

फोटो पी १७ पळसखेड

चांदूर रेल्वे : शहरातून पळसखेड कडे जाणाऱ्या या वर्दळीच्या रस्त्यावरील नाल्याच्या पुलाला कठडे नसल्यामुळे वृत्तपत्रांतून बातमी प्रकाशित झाली होती. सदर बातमीची दखल घेत पुलाला कठडे बसविण्याचे असुन झाले असुन सावधान चे फलक सुध्दा लावण्यात आले. बुधवारी सदर काम सुरू होते.

चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील पाईप कंपनीजवळील पूल कठड्यांविना आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाळ्यात प्रवाशांच्या जिवाचा धोका निर्माण झाला होता. तसेच हा पुल वळण रस्त्यावर असुन या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा गतीरोधक नसल्याने अनेक वाहने भरधाव जातात व अपघाताची शक्यता वाढत आहे. पावसाळ्यात नाल्याचे पाणी वाढल्यास पाणी रस्त्यावर येते व पुन्हा पाणी वाढत राहिल्यास रस्ता कोणता आणि नाला कोणता हे सुध्दा चालकांना ओळखायला येत नाही. सदर पुलावर आजुबाजुने कुठलेही संरक्षण नसल्याने व पुलावरील पाणी वाढल्यामुळे तसेच चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना १० जुन रोजी घडली. यात सुदैवाने एका कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले होते. तर अनेक दुचाकी चालक गाडी घसरून या पुलावर पडले सुध्दा आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे होते. सदर बाब वृत्तपत्रातून प्रकाशित होताच बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी. एम. कोवळे यांनी त्वरीत दखल घेतली. व सदर पुलावर कठड्यांची व्यवस्था करण्यात आली. तसेच सावधाव, पुलावरून पाणी वाहत असतांना पुल ओलांडू नये असे फलक सुध्दा लावले. सहाय्यक अभियंता ए. बी. कोळकर यांच्या मार्गदर्शनात सदर काम बुधवारी सुरू होते. आता याठिकाणी केवळ गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे.

(बॉक्समध्ये घेणे)

१)

शिवसेनेने सुध्दा दिले होते निवेदन

सदर बातमी वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागात निवेदन देऊन या पुलावर कठडे व दिशादर्शक फलक व गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती.

२)

रेल्वे हद्दीमुळे पुलाची उंची वाढविता येत नाही

कठड्याची तात्पुरती उपाययोजना बांधकाम विभागाकडून करण्यात आली. मात्र खरं तर या पुलाची उंचीच वाढविणे गरजेचे आहे. परंतु रेल्वे प्रशासनाची हद्द असल्याकारणाने बांधकाम विभागाला त्यात बांधकाम करता येत नसल्याचे बांधकाम विभागाकडून समजते.

===Photopath===

170621\1730-img-20210617-wa0031.jpg~170621\1730-img-20210617-wa0030.jpg

===Caption===

photo~photo

Web Title: Eventually, "that" bridge on Palaskhed road was paved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.