अखेर कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:14 AM2021-01-20T04:14:55+5:302021-01-20T04:14:55+5:30

कॅप्शन - कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रकाशित केले होते. उच्च न्यायालयाचा दणका, कारागृह अपर ...

Eventually prison officials and staff will be transferred | अखेर कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

अखेर कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

Next

कॅप्शन - कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रकाशित केले होते.

उच्च न्यायालयाचा दणका, कारागृह अपर पोलीस महासंचालकांनी मागविले ३१ जानेवारीपर्यंत ई-मेलवर अर्ज

गणेश वासनिक -अमरावती : गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एककल्ली कारभारामुळे रखडलेल्या कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परिणामी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी ३१ जानेवारीपर्यंत ई-मेलवर बदली अर्ज मागविले आहेत. उशिरा का होईना, कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.

धुळे जिल्हा कारागृहातील एका रक्षकाने १७ जानेवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना पत्र पाठविले. यात कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी न्यायालयाचा अवमान कसा करतात, हे पुराव्यानिशी मांडण्यात आले होते. पीआयएल-सीजे-एलडी-व्हीसी-२ ऑफ ॲन्ड २ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान होत असल्याचे त्याने सांगितले. औरंगाबाद मध्य विभाग कारागृह उपमहानिरीक्षकांकडे सन २०१६ ते २०२० दरम्यान पती-पत्नी एकत्रित शासन धोरणातंर्गत बदली विनंती अर्ज सादर केल्याचे पुरावेसुद्धा पाठविले होते. अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह सुधार

व सेवा) यांनी सन २०१९ पासून कारभार स्वीकारल्यानंतर वेगवेगळी तांत्रिक कारणे देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीपासून वंचित ठेवले, असा आक्षेप या रक्षकाने घेतला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या कारागृह रक्षकाची कैफीयत जाणून घेतली. एक रक्षकाने वरिष्ठाविरुद्ध आवाज बुलंद करताच त्याच्या मागणीची दखल उच्च न्यायालयाने घेतली. याचिकेतील सुनावणीनुसार ऐच्छिक जागांवर पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने कारागृह विभागाच्या वरिष्ठांना दिलेत. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी १८ जानेवारी २०२१ रोजी एक पत्र निर्गमित करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना

सर्वसाधारण बदल्या, विनंती बदलीसाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

---------------------

जुलै २०२० पासून रखडल्या होत्या बदल्या

कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या जुलै २०२० पासून रखडल्या आहेत. वरिष्ठांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या बदलीसंदर्भात आदेशाचे वेगळे अर्थ काढले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा फटका कारागृहातील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसला. मात्र, आता सार्वत्रिक बदल्या २०२१ अन्वये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविले आहे. यात सर्वसाधारण बदलीसाठी सहा वर्षे सेवेचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे, तर विनंती बदलीमध्ये बदलीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, पण तातडीचे, अत्यंत निकडीचे कारणास्तव बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. बदलीसाठी सबळ पुरावे मुख्यालयात सादर करावे लागणार आहे.

----------------------------

Web Title: Eventually prison officials and staff will be transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.