रासेगावात शहीद जवानांसाठी प्रत्येक घरी एक दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:48 PM2017-10-23T13:48:49+5:302017-10-23T13:51:47+5:30

अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे गावकºयांनी गावातील प्रत्येक घरी देशासाठी शहीद झालेल्या व देशासाठी लढत असलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ प्रत्येक घरी एकेक दीप प्रज्वलित करण्यात आला.

Every family lamp for the martyred soldiers in Rasegaon | रासेगावात शहीद जवानांसाठी प्रत्येक घरी एक दिवा

रासेगावात शहीद जवानांसाठी प्रत्येक घरी एक दिवा

googlenewsNext
ठळक मुद्देशहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्तजवानांच्या शौर्याचे कथनगावातील जवानांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
अमरावती- अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे गावकºयांनी गावातील प्रत्येक घरी देशासाठी शहीद झालेल्या व देशासाठी लढत असलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक दिवा लावण्याचे व्रत मागील वर्षापासून अंगिकारले असून व त्यानुसार यंदाही प्रत्येक घरी एकेक दीप प्रज्वलित करण्यात आला.
देशासाठी जे आपले सर्वस्व पणाला लावतात अशा सैनिकांबद्दल जनतेच्या मनात सन्मान वाढावा, त्यांच्या कार्याला सलाम करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्र माचे आयोजन मागील वर्षांपासून रासेगाव येथे करण्यात येत आहे.
या कार्यक्र मात माजी सैनिक श्रीरामजी कांबळे तसेच सध्या सैन्यात असलेले सैनिक अमोल गायगोले, सतीश गायगोले व निखिल गायगोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांनी युद्धक्षेत्रातील व सैन्याबद्दलची माहिती दिली.

Web Title: Every family lamp for the martyred soldiers in Rasegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.