कलेला सलाम! धानोऱ्यातील युवकाने साकारली राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 05:04 PM2022-01-02T17:04:24+5:302022-01-02T17:14:39+5:30

अमरावती : कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या ...

An exact replica of Rashtrapati Bhavan was created by a youth from Dhanora | कलेला सलाम! धानोऱ्यातील युवकाने साकारली राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती

कलेला सलाम! धानोऱ्यातील युवकाने साकारली राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती

googlenewsNext
ठळक मुद्देलागला सहा महिन्यांचा कालावधी

अमरावती : कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो. परंतु इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचा अजब छंद चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील एका युवकाने जोपासला आहे. संसद भवनानंतर आता राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती त्याने तयार केली आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील अमर सुरेश मेश्राम या युवकाला ३०४ खोल्यांच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी सदर युवकाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. याकरिता फाईल शीट, टुथपिक्स व प्लायवुड हे साहित्य वापले आहे. यापूर्वी त्याने संसद भवनाची प्रतिकृती तयार केली होती. याशिवाय विविध इमारतींची प्रतिकृती या युवकाने बनविली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रतिकृतीमध्ये तेथे असणाऱ्या बारीक-बारीक गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत, हे विशेष.

अमर मेश्राम याच्या कामगिरीबद्दल गावातील गणेश आरेकर, सुधीर नलगे, सरपंच कल्पना नलगे, उपसरपंच रवींद्र मोहोड, अब्दुल समद, प्रदीप निहाटकर, भाविक गुजर, नितीन कातोटे, भूषण अंबूलकर, रवींद्र नन्नावरे यांच्यासह अनेकांनी कौतुक केले.

Web Title: An exact replica of Rashtrapati Bhavan was created by a youth from Dhanora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.