कला शाखेच्या शेतकरीपुत्रांनाच परीक्षा शुल्कमाफी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:25 PM2020-01-24T18:25:34+5:302020-01-24T18:38:15+5:30

विज्ञान, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी वगळले : ‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळात पिकांचे नुकसान; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक

Examination fee waiver only for farmers child of art branch in amravati | कला शाखेच्या शेतकरीपुत्रांनाच परीक्षा शुल्कमाफी

कला शाखेच्या शेतकरीपुत्रांनाच परीक्षा शुल्कमाफी

Next

अमरावती - राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झेलणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यात केवळ कला महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित अन्य शाखांमधील पात्र शेतकरीपुत्रांना शुल्कमाफी मिळणार नसल्याचे परिपत्रक २१ जानेवारी २०२० रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले. हा विद्यार्थ्यांमध्ये भेद निर्माण करणारा निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राज्यात ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमध्ये पारंपरिक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. यात आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत आणि विविध सवलती लागू करण्याचा निर्णय महसूल व वन विभागांकडून १८ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आला. या शासननिर्णयान्वये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने कला संचालनालयाच्या नियंत्रणातील कला महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी सवलत देण्याचे आदेश विद्यापीठ तसेच कला संचालनालयास देण्यात आले आहे. याचा लाभ सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना मिळेल. शासन परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले असेल, त्यांना संबंधित संस्थांकडून परत करावे लागणार आहे. ही सवलत केवळ आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. 

छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती  योजनेखाली शिष्यवृत्तीासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ५० टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळेल. या योजनेत पात्र रकमेची मागणी महाविद्यालयांनी विद्यापीठ अथवा कला संचालनालयाकडे करावी, असे नमूद केले आहे. 

शासन परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यात जे शेतकरीपुत्र विद्यार्थी पात्र असतील, त्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ दिला जाईल.

- केशव तुपे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण अमरावती
 

Web Title: Examination fee waiver only for farmers child of art branch in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.