तीनशे शेतकऱ्यांच्या शेत बांधांचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:07 PM2018-06-20T23:07:28+5:302018-06-20T23:07:40+5:30

खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

Excavation of three hundred farmers' farm constructions | तीनशे शेतकऱ्यांच्या शेत बांधांचे खोदकाम

तीनशे शेतकऱ्यांच्या शेत बांधांचे खोदकाम

Next
ठळक मुद्देमोबाईल कंपनीचा कहर : पावसाळ्यात शेतीचा रस्ता केला बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.
जुना धामनगाव ते चांदूर रेल्वे या मार्गावर एका मोबाईल कंपनीचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. दररोज शेतीचे बांध खोदले जात असून, हे केबल टाकताना कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने शेतकऱ्यांत आक्रोश निर्माण झाला आहे. पेरणीसाठी शेती तयार केल्यानंतर ऐनवेळी शेतीचे बांध खोदल्याने शेतकरी नाराज झाले आहे.
रात्री शेतबांधात खोदकाम
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर खोदकाम करण्यास नकार दिला, त्या शेतकऱ्यांचे बांध रात्रीला केबल टाकण्यासाठी खोदले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. रात्रीला खनन करू करता येत नसताना महसूल विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
बांधकाम विभाग झोपेत
कोणत्याही मोबाईल कंपनीचा केबल टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या जागेवरची ना -हरकत परवानगी गरजेची असते. तब्बल तीनशे शेतकऱ्यांच्या शेतावरील बांध खोदला जात असून, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे काय, यासंदर्भात हा विभाग उत्तर देत नाही. कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता बोलण्यास तयार नाही.
कंत्राटदाराची दमदाटी
आपल्या शेतीचे बांध खोदण्यासाठी आमची परवानगी नसताना पेरणीच्या काळात का खोदले जात आहे, अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला विचारले असता शेतकऱ्यांची दमदाटी केली जात आहे, अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. आमचीच शेती अन् आम्हालाच जीवे मारण्याची धमकी संबंधित कंत्राटदाराकडून मिळत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पावसाळ्याचे दिवस त्यांत शेतीची पेरणीची वेळ असताना बांधच केबलसाठी फोडले जात आहे. सदर कंत्राटदारावर त्वरित फौजदारी कारवाई करावी.
- श्रीकांत रोंघे,
शेतकरी, विरूळ रोंघे

Web Title: Excavation of three hundred farmers' farm constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.