अंतिम सत्र वगळता अन्य सर्व परीक्षा विद्यापीठाने रद्द कराव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:32+5:302021-07-20T04:10:32+5:30
अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच परीक्षा संचालन आनि नवीन शैक्षणिक नियमिका संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच परीक्षा संचालन आनि नवीन शैक्षणिक नियमिका संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम सत्र वगळता अन्य सर्व परीक्षा रद्द कराव्या, अशी मागणी शिक्षण मंचने केली आहे.
शिक्षण मंचचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी उन्हाळी २०२१ परीक्षेसंदर्भात आणि पुढील वर्षी २०२१-२२ करिता नवीन शैक्षणिक नियमिका अवलंबकरण्याकरिता निवेदन सादर केले. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हित जोसापण्यासाठी यूजीसीच्या मागदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या फक्त अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्या व इतर सर्व सत्र अंतर्गत मूल्यमापन आणि पूर्व सत्रातील गुणांच्या आधारे मूल्यांकन करावे अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. विद्यापीठाद्वारे उन्हाळी २०२१ परीक्षांची प्रक्रिया घोषित केलेली असून, त्यामध्ये सर्वच सत्राच्या परीक्षा घेण्याचे जाहीर केलेले आहे. म्हणून अधिसूचनेमध्ये बदल करणे विद्यार्थी हितार्थ अत्यावश्यक असल्याची मागणी शिक्षण मंचद्वारा करण्यात आली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या परीक्षांची घोषित प्रक्रिया तत्काळ रद्द करून यूजीसी च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे परीक्षांचे संचालन करावे, अशी मागणी प्रदीप खेडकर यांनी केली आहे. हा निर्णय विद्यार्थी वर्गाच्या हिताचा तसेच त्यांच्यावरील मानसिक दडपण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन नवीन मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर निर्गमित कराव्या असे निवेदनातून म्हटले आहे.