दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:21 PM2017-11-10T23:21:07+5:302017-11-10T23:21:28+5:30

फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे.

Excise for the debt of three farmers in the step | दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

Next
ठळक मुद्देवास्तव : कर्ज जसेच्या तसे, दिशाभूल केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे. शेकडो शेतकºयांनी या योजनेत कर्जमाफीचे अर्ज भरले. मात्र, तालुक्यातील केवळ तीन शेतकºयांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती आहे.
दर्यापूर तालुक्यातील बाजीराव पायरूजी तायडे (रा. खुर्माबाद) यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे ३४ हजार ९७० रुपये, प्रल्हाद व्यंकोजी   गावंडे (रा. जैनपूर) यांच्यावर ५६ हजार ५६५ रुपये कर्ज व वकिला बबन गावंडे (रा. लोतवाडा) यांच्यावर ६५ हजार ४९१ रुपये कर्ज होते. या तीन शेतकºयांना अमरावती येथे झालेल्या एका कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, खात्यावर कर्ज कायम असल्याचे या तिन्ही शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे कर्जमाफी खरोखर झाली की नाही, असा सवाल या शेतकºयांनी केला आहे.
शेतकºयांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला होता. आॅनलाइन अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. तरीदेखील कर्जमाफीचे अर्ज सादर केले. आता केवळ तीन जणांची कर्जमाफी झाल्याने शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

भाजप सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांचे कर्ज माफ करण्याच्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, कर्जमाफीचे प्रमाणपत्रही कागदावर राहिले. शासनाकडून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी बँकेकडे कोणतेही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली आहे.
- सुधाकर भारसाकळे
जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Excise for the debt of three farmers in the step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.