थकीत कराअभावी सहा खदानी सील

By admin | Published: March 30, 2016 12:43 AM2016-03-30T00:43:56+5:302016-03-30T00:43:56+5:30

अतिरिक्त उत्खनन करून गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी महसूल विभागाने सील केल्या आहेत.

Exhausted six throttle seals | थकीत कराअभावी सहा खदानी सील

थकीत कराअभावी सहा खदानी सील

Next

महसूलची कारवाई : पोकलँड, जेसीबी, थ्रेशर, कंट्रोल रुम ताब्यात
अमरावती : अतिरिक्त उत्खनन करून गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी महसूल विभागाने सील केल्या आहेत. संबंधित खदान मालकांकडे रॉयल्टीचे दोन कोटी रुपये थकीत असल्याप्रकरणी पोकलँड, जेसीबी, थ्रेसर व कंट्रोलरुम ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. अमरावती तहसील अंतर्गत सहा खदान मालकांकडे दोन कोटी रुपये रॉयल्टीचे थकीत होते. ही रक्कम खदान मालकांनी भरावी, यासाठी महसूल विभागाने वारंवार नोटीस, पत्रव्यवहार देखील केला. मात्र खदान मालकांनी महसूल विभागाच्या या नोटीसला केराची टोपली दाखविली. दुसरीकडे महसूल उत्पन्नात जिल्हा माघारल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल उत्पन्न वाढीसाठी धडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती तहसील कार्यालयाने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम २०१३ चे उपनियम ३३ नुसार मासोद येथील अंबादास शेळके, सुभाष तायडे, विनोद मुधोळकर तर परसोडा येथील सचिन राजुरकर, शेवती येथील नीलिमा पिंपळकर व सचिन राजूरकर आणि उदखेड येथील मनोज कपूर या खदान मालकांना नोटीस बजावून रॉयल्टीची थकीत रक्कम भरावी, अन्यथा खदानी सील होतील, असे कळविले होते. महसूल विभागाने मंगळवारी खदानी सील केल्या आहेत.

Web Title: Exhausted six throttle seals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.