अमरावती (बेलोरा) विमानतळाचे विस्तारीकरण निधीअभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:12 AM2021-03-15T04:12:39+5:302021-03-15T04:12:39+5:30
फोटो - १४एएमपीएच ०१, ०२, ०३ १४एएमपीएच०१ - विमानतळाच्या जमिनीचे सपाटीकरण होत आहे. १४एएमपीएच०२ - विमानतळाच्या संरक्षणभिंतीचे करण्यात येत ...
फोटो - १४एएमपीएच ०१, ०२, ०३
१४एएमपीएच०१ - विमानतळाच्या जमिनीचे सपाटीकरण होत आहे.
१४एएमपीएच०२ - विमानतळाच्या संरक्षणभिंतीचे करण्यात येत असलेले काम
१४एएमपीएच०३ - अमरावती (बेलोरा) विमानतळाचा दर्शनी भाग
----------------------------------------------------------------------
गणेश वासनिक
राज्य अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसताना निधी कमी पडू न देण्याचे अर्थमंत्र्यांचे आश्वासन
अमरावती : जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांवर आहे. विभागीय केंद्र, रेल्वे, उद्योगधंद्यांचे जाळे, राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी येथून प्रमुख शहरांकरिता विमानांचे ‘टेक-ऑफ’ आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गालगत १९९८ मध्ये ७४.१८ हेक्टर क्षेत्रावर यासाठी धावपट्टी होती. आता एकूण ३८६ हेक्टर जागेवर बेलोरा विमानतळाचे १५६.२२ कोटींचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे.
सन २०१० ते २०१३ या दरम्यान जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला सन २०१९ पासून प्रारंभ झाला. त्यावेळी ८५ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले. मात्र, ऑक्टोबर २०२० पासून निधीअभावी विकासकामे प्रलंबित आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बेलाेरा विमानतळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. तथापि, निधीची तरतूद केली नाही. निधी मिळण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर आग्रही होत्या, हे विशेष. देयके रखडल्याने विमानतळावरील विकासकामे ठप्प आहेत.
----------------
या कामांसाठी निधीची गरज
संरक्षणभिंत, टर्मिनस, रन-वे, टॉप लेअर डांबरीकरण, सर्व्हिलान्स बिल्डिंग, एटीएस टॉवर, फायर टेंडर, विद्युत व्यवस्था, उच्च दाब वाहिनी, जमिनीचे सपाटीकरण, सांडपाणी व नाल्या, स्थापत्य कामे, वाहनतळ आदी कामांसाठी निधीची गरज आहे.
-----------------
अमरावती (बेलोरा) विमानतळ
जमीन - ३८६ हेक्टर
प्रस्तावित निधी - १५६.२२ कोटी
झालेली कामे - ७० टक्के