शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 02:02 PM2022-03-03T14:02:36+5:302022-03-03T14:25:00+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर म्हणाल्या.

Exploited women should create counter culture said ambedkarite thinker Hemalatha Mahishwar | शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर

शोषित महिलांनी प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे : हेमलता महिश्वर

Next
ठळक मुद्दे तिसरे आंबेडकरी महिला साहित्य संमेलनसेरींग डोल्मा, वृंदा साखरकर, छायाताई खोब्रागडे, डॉ. पुष्पा थोरात यांची उपस्थिती

अमरावती : समकाळात कार्यरत असलेल्या परंपरावादी संस्कृती नाकारून नव्या प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे आणि ती आंबेडकरी महिलाच मोठ्या जबाबदारीने करु शकते असे आश्वासक प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर यांनी केले.

आशय या संस्थेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी परीसरात अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या तिसऱ्या अखिल भारतीय महिला आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हेमलता महिश्वर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भारतीय समाजव्यवस्थेने सतत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे. यासंबंधी अनेकवेळा जनजागृतीचे कार्यक्रम झाले, विविध आंदोलने झाली आहेत. स्रीवादी चळवळींनी  पुरुष आणि स्त्रियांमधीलसुद्धा पुरुषी मानसिकता बदलविण्याकरीता अटोकाट प्रयत्न केले आहेत. परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे त्या म्हणाल्या. 

माणसाच्या भावनिकतेला फुंकर घालून निर्माण होणारी धार्मिक तेढ ही राजसत्तेला खतपाणी घालीत आहे. ते भाषा आणि संस्कृतीवर हल्ले चढवून त्यांना त्यांची संस्कृती आपल्यावर लादायची आहे. त्यामुळे आपणही त्याचा प्रतिकार करीत बालकांना आणि महिलांना तयार केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

बालकांमध्ये अनुकरण आणि अनुसरण प्रवृत्ती असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी बाल साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. पाली भाषा देशातील सर्व विद्यापीठांमध्ये शिकवायला हवा. संविधानाच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी तिबेटच्या सेरींग डोल्मा, वृंदा साखरकर (अमेरिका), अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे, अशोक बुरबुरे, छायाताई खोब्रागडे, स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा थोरात, प्रशांत वंजारे यांची उपस्थिती होती.

पुरुषांच्या मानसिकतेत बदल हवा - सेरींग डोल्मा

तिसऱ्या अखिल भारतीय महिला आंबेडकरी साहित्य संमेलनात बोलताना तिबेटी महिला असोसिएशनच्या प्रवक्त्या सेरींग डोल्मा म्हणाल्या की भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना ठेवण्यासाठी त्यांच्या मानसिकतेत मूलगामी बदल होणे गरजेचे आहे. आपण स्री आणि पुरुषांनी वेगळा विचार करणे धोक्याचे आहे. आमच्या तिबेटमध्ये जगणे कठीण झाले आहे. अनेकांची सरेआम कत्तल झाली आहे. आमच्या तिबेटमधील स्वातंत्र्याची चळवळ आम्ही भारतात राहून चालवित आहोत. आमच्या महिलांना साथ देण्यासाठी इथल्या आंबेडकरी महिलांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Exploited women should create counter culture said ambedkarite thinker Hemalatha Mahishwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.