सामाजिक न्यायाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

By admin | Published: April 15, 2015 12:08 AM2015-04-15T00:08:12+5:302015-04-15T00:08:12+5:30

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध सर्वांगीण विकासाच्या योजना राबविण्यात येतात.

Extend the social justice plan to the last element | सामाजिक न्यायाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

सामाजिक न्यायाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत्युत्सव : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन
अमरावती : मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी शासनातर्फे विविध सर्वांगीण विकासाच्या योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा उद्योग, राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पालकमंत्र्यांनी अभिवादन केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी दिलीप एडतकर हे होते. महापौर रीना नंदा-कौर, खासदार आनंदराव अडसूळ, जगदीश गुप्ता, वसुधाताई देशमुख, संजय बंड, राजेंद्र गवई, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सीईओ अनिल भंडारी, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभु, विलास इंगोले, प्रकाश साबळे, बापुराव गायकवाड, सतीश गवई अरुण मोंढे, आयोजन समितीचे अध्यक्ष किशोर बोरकर आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वजण शिक्षित झालो आहोत. मोठी पदे मिळालीत. त्याचा लाभ तळागळातील सर्व बांधवांना पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
मोठे स्मारक, पुतळा सुशोभिकरण, परिसर सौदर्यीकरणासाठी सुमारे २ कोटी ५२ लक्ष रुपये लागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यापैकी १ कोटी रुपयांचा निधी महापालिका देणार असून जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून १ कोटी रुपये देण्यासाठी आपण प्रयत्न करू. लोकवर्गणीतून ३१ लक्ष रुपये उभे करावेत. उर्वरित २१ लक्ष रुपये मी माझ्या आईच्या नावाने देणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

Web Title: Extend the social justice plan to the last element

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.