फेस्टिव्हल रेल्वे गाड्यांना ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:08 AM2020-12-28T04:08:32+5:302020-12-28T04:08:32+5:30
अमरावती : रेल्वे बोर्डाने फेस्टिव्हल गाड्यांना आता ३० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात २२ जोडी गाड्यांमध्ये प्रवाशांना ...
अमरावती : रेल्वे बोर्डाने फेस्टिव्हल गाड्यांना आता ३० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात २२ जोडी गाड्यांमध्ये प्रवाशांना कोरोना नियमावलींचे पालन करून प्रवास करता येणार आहे. यापूर्वी फेस्टिव्हल गाड्या ३० डिसेंबरपर्यंत धावणार होत्या, हे विशेष.
बडनेरा रेल्वे स्थानकावर फेस्टिव्हल रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. हल्ली अमरावती रेल्वे स्थानकाहून पुणे एक्स्प्रेस, तिरुपती एक्स्प्रेस या दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. उर्वरित रेल्वे गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून धावत आहेत. या फेस्टिव्हल गाड्यांमध्ये आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. कोरोना नियमावलींचे पालन करावे लागेल. आरक्षण तिकीट नसल्यास प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, ही बाब रेल्वे विभागाने स्पष्ट केली आहे.
--------------------------------
या फेस्टिव्हल गाड्यांना मुदतवाढ
एलटीटी - हावडा, नागपूर-मडगाव, ओखा-हावडा, पोरबंदर- हावडा, विशाखापट्टणम- एलटीटी, हटीया- एलटीटी, जीआयएमबी- विशाखापट्टणम, अमरावती- तिरुपती, खुर्दारोड- अहमदाबाद, गांधीधाम - पुरी, अहमदाबाद- पुरी,ओखा- पुरी, हावडा- अहमदाबाद, हावडा- मुंबई, पुणे-नागपूर, मुंबई- गोंदिया, पुणे-नागपूर, पुणे-अजनी, अमरावती- पुणे, कोल्हापूर, चेन्नई- अहमदाबाद या २२ जोडी गाड्यांना ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.