राज्यातील खासगी सिंचन योजनांना मुदतवाढ, आठ  प्रकल्प वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 07:28 PM2017-11-11T19:28:29+5:302017-11-11T19:29:09+5:30

राज्यातील आठ प्रकल्प वगळता सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व जलाशयावरील खासगी उपसा सिंचन योजनांना ७ जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला.

Extension of private irrigation schemes in the state, eight projects excluded | राज्यातील खासगी सिंचन योजनांना मुदतवाढ, आठ  प्रकल्प वगळले

राज्यातील खासगी सिंचन योजनांना मुदतवाढ, आठ  प्रकल्प वगळले

Next

अमरावती - राज्यातील आठ प्रकल्प वगळता सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व जलाशयावरील खासगी उपसा सिंचन योजनांना ७ जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला.

टेंभू उपसा सिंचन योजना (सांगली), भीमा (उजनी), मुळा सिंचन योजना (अहमदनगर), निम्न मानार (नांदेड), हतनूर, ऊर्ध्व पूस (यवतमाळ), कान्होली नाला (नागपूर), अंबोली (सिंधुदुर्ग) हे प्रकल्प वगळून राज्यातील इतर सर्व पाटबंधारे प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) २००५ च्या कलम १२ (६) (घ) मध्ये नमूद केल्यानुसार पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या अटीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने प्राप्त होणाºया खासगी उपसा सिंचन योजनांच्या प्रस्तावांतील बारमाही पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरणे बंधनकारक राहणार असल्याचे सदर शासननिर्णयात नमूद करण्यात आले  आहे.

Web Title: Extension of private irrigation schemes in the state, eight projects excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.