दहावीच्या आॅनलाईन अर्जसाठी मुदतवाढ

By admin | Published: November 5, 2015 12:19 AM2015-11-05T00:19:54+5:302015-11-05T00:19:54+5:30

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

Extension for SSA online application | दहावीच्या आॅनलाईन अर्जसाठी मुदतवाढ

दहावीच्या आॅनलाईन अर्जसाठी मुदतवाढ

Next

३० नोव्हेंबर : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
अमरावती : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे अद्यापही विभागीय शिक्षण मंडळांना प्राप्त न झाल्याने ती ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी-शेतमजुरांची अवस्था विदारक आहे. यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू न शकल्याने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क माफ करण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांकडून परीक्षा आकारण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही सर्व विभागीय शिक्षण मंडळ व अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. २३ आॅक्टोबरला पत्राद्वारे ही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली आहे.
परंतु अद्यापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्रे शिक्षण मंडळाना प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आॅनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

माध्यमिक शाळांना सूचना
माध्यमिक शाळांनी शुल्क भरलेल्या चालानसह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे २३ नोव्हेंबरपर्यंत जमा करायच्या आहेत. तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत याद्या जमा कराव्यात, असे विभागीय सचीव संजय यादगिरे तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व अमरावती विभागीय मंडळाने कळविले आहे.

Web Title: Extension for SSA online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.