तूर केंद्रांना मुदतवाढ, खरेदी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:36 AM2018-04-25T01:36:12+5:302018-04-25T01:36:12+5:30

जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद १८ एप्रिलपासून बंद करण्यात आलेत. शेतकºयांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने ठिकठिकाणी आंदोलने झालीत, अखेर शासनाला नमते घ्यावे लागले.

Extension of tour centers, when to buy? | तूर केंद्रांना मुदतवाढ, खरेदी केव्हा?

तूर केंद्रांना मुदतवाढ, खरेदी केव्हा?

Next
ठळक मुद्दे१५ मे डेडलाइन : नोंदणी झालेल्या ४२,४९० शेतकऱ्यांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद १८ एप्रिलपासून बंद करण्यात आलेत. शेतकºयांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने ठिकठिकाणी आंदोलने झालीत, अखेर शासनाला नमते घ्यावे लागले. या केंद्रांना आता १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सहकारमंत्र्यांनी केली. तशा सूचना स्थानिक स्तरावर आल्यात, मात्र अद्याप अधिकृत पत्र नसल्याने तूर खरेदीचा मुहूर्त केव्हा, अशा शेतकºयांचा सवाल आहे.
जिल्ह्यातील १२ केंद्रावर १८ एप्रिलपर्यंत २७ हजार १० शेतकºयांची चार लाख २४ हजार ६४९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. प्रत्यक्षात जिल्ह्यातील १२ ही केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंत ६९ हजार ५०० शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. यापैकी ४२ हजार ४९० टोकनधारक शेतकºयांची तूर खरेदी व्हायची आहे. त्यामुळे शेतकºयांचा शासनाप्रती मोठा प्रमाणात रोष आहे.
यंदाच्या हंगामात साधारणपणे एक लाख १० हजार क्विंटल तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १३.५० क्विंटल जाहीर केली त्यानुसार जिल्ह्यात यंदा १४.८५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकºयांच्या घरी किमान चार लाख क्विंटल तूर पडून आहे. आता केंद्र सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना असल्या तरी जिल्ह्यात गोदामाची कमी आहे. खरेदीदार यंत्रणेला अधिकृत पत्र नसल्यामुळे मुदतवाढ मिळूनही प्रत्यक्षात खरेदी केव्हा सुरू होते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

खरेदी बाकी असलेली टोकनधारक शेतकरी संख्या
सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर ६,४२४, अमरावती ५,४१६, अंजनगाव सुर्जी ३,२१४, चांदूर बाजार ४,४०९, चांदूर रेल्वे २,६३०, दर्यापूर २,८३३, धारणी ५३०, नांदगाव खंडेश्वर ३,३०७, तिवसा १,००९, मोर्शी ३,२५३, धामणगाव रेल्वे ५,०५९ व वरूड तालुक्यात ४,३९६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केलेली असून मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत.

तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली व यासंदर्भात शासनाच्या सूचनाही आहेत. आजच केंद्र सुरू करावे, अशा सूचना डीएमओंना दिल्यात. काही कारणास्तव राहिल्यास बुधवारी तूर खरेदी सुरू होईल.
- अभिजित बांगर,
जिल्हाधिकारी

Web Title: Extension of tour centers, when to buy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.