चांदूरबाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:56+5:302021-09-04T04:16:56+5:30

मागिल पाच वर्षांत ४२ टक्याने घटली,नर गोवंशाची संख्या. शेतीची सुपिकता ढासळतेय, शेणखताची जागा रासायनिक खताला सुमित हरकुट-चांदूरबाजार : एकेकाळी ...

Extremely low number of oxen in Chandurbazar taluka | चांदूरबाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट

चांदूरबाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट

Next

मागिल पाच वर्षांत ४२ टक्याने घटली,नर गोवंशाची संख्या.

शेतीची सुपिकता ढासळतेय, शेणखताची जागा रासायनिक खताला

सुमित हरकुट-चांदूरबाजार : एकेकाळी संपूर्ण गोवंश शेतकऱ्यांचे धन होते. यात नर गोवंश अर्थात बैल हा शेतकऱ्यांचा जिव की प्राण होता. खरे तर पूर्वीच्या काळी गोठ्यातील बैलजोडीच्या व गायींच्या संख्येवरून शेतकऱ्यांची "प्रतिष्ठा" ठरत होती. परंतु मागील १० वर्षांत शेतीत यांत्रिकीकरण आले. त्यामुळे बैलांची कामे यंत्राद्वारा व्हायला लागली. परिणामी चांदूर बाजार तालुक्यात बैलांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे चित्र समोर सन २०१८-१९ पशू गणनेत वरून स्पष्ट झाले.

दर पाच वर्षांनी राज्यात पशूगणना केली जाते. यात गोवंश, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढव, वराहांसह इतरही पशूंची गणना करण्यात येते. यात सन २०१२-२०१३ च्या पशूगणनेत तालुक्यात १६,६२० नर गोवंशाची संख्या होती. २०१८-२०१९ च्या गणनेत ही संख्या ९ हजार ४१० इतकी आहे. यावरून मागील पाच वर्षांत नर गोवंशाची, अर्थात बैलांची संख्या ७ हजार २१० ने घटली आहे. यावरून मागील पाच वर्षांत तालुक्यात, नर गोवंशाची संख्या, ४२ टक्क्यांनी घटली आहे.

तालुक्यातील शेती क्षेत्रात दरवर्षी १,४४२ इतक्या संख्येने बैलांची घट झाली आहे. शेतकऱ्यांकडील बैलांसह गायींच्या संख्येत, दिवसेंदिवस होणारी ही घट अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे. गोवंशाच्या घटत्या संख्येमुळे शेतीची सुपीकता लयास जात आहे. याचा पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम जाणवत आहे. शेतीत सेंद्रीय पदार्थाचे कमतरतेमुळे, पिकांची उत्पादकता टिकून राहत नाही. रासायनिक शेतीत काही वर्षे उत्पादकता चांगली येते. मात्र, रसायनांचा शेतातील मातीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादकता घटण्यास सुरुवात होते. अलीकडे शेती न परवडणारा हे एक प्रमुख कारण असू शकते.

बैलाची संख्या घटण्यामागचे यांत्रिकीकरण प्रमुख कारण असले तरी, बैलजोडीची वाढलेली किंमत हेदेखील एक कारण आहे. दर्जेदार बैलजोडीची किंमत एक लाखापर्यंत आहे. अशातच जनावरांच्या वैरणाचाही प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. यामुळे शेती व्यवसायातील गोवंशाची घट होत आहे. ही घट अशीच कायम राहिल्यास भविष्यात पोळा भरवायलाही बैल सापडणार नाही. तेव्हा मातीच्या बैलांचा पोळा भरवावा लागेल. बैलांऐवजी ट्रॅक्टरचा पोळा भरविला जात आहे. हा गोवंश नष्ट होण्याचा संदेशच म्हणावा लागेल की काय? असे चिन्ह दिसत आहे. शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळताना शेतीची सुपिकता कायम राखण्यासाठी गोवंशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Web Title: Extremely low number of oxen in Chandurbazar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.