ओळख पटू नये म्हणून चेहरा ठेचला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:46+5:302021-02-08T04:12:46+5:30

नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील तळेगाव ते विचोरी मार्गावरील एका शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात शिरखेड पोलिसांना यश आले ...

Face crushed so as not to be identified! | ओळख पटू नये म्हणून चेहरा ठेचला!

ओळख पटू नये म्हणून चेहरा ठेचला!

Next

नेरपिंगळाई : मोर्शी तालुक्यातील तळेगाव ते विचोरी मार्गावरील एका शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात शिरखेड पोलिसांना यश आले आहे. तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खून, बलात्कार व खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. मृत महिलेची ओळख पटू नये म्हणून आरोपीने दगडाने तिचे तोंड ठेचले. शरीराच्या पार्श्वभागात काड्या टोचून तिचा अमानुष खून केला.

तळेगाव ते विचोरी रोडवरील वानखडे यांच्या शेतात अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्री जातीचे प्रेत मृतावस्थेत पडल्याची माहिती तळेगाव येथील पोलीस पाटील किशोर ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास शिरखेड पोलिसांना दिली होती. डोक्यात दगड मारून तिला ठार केल्याची बाब पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी तळेगाव दाभेरी ग्रामस्थांकडून माहिती घेतली. ती मोर्शी तालुक्यातील मनिमपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या व आता तळेगाव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न न करता वास्तव्याला असल्याचे ६ फेब्रुवारी रोजी सकाळी समोर आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला विचारणा केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली. सलग रात्रभर पोलिसांनी त्यासाठी प्रयत्न केले. मृताची ओळख पटल्यानंतर शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३७६, ३७६ (१), ३७६ (२), ड, २०२ अन्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार केशव ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे, अंमलदार अजय अडगोकार, अनिल गुल्हाने, मनोज टप्पे, बलवंत टाके, अमित आवारे, उमेश कुंभेकर, छत्रपती करतपे, प्रीती शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल तपास करीत आहेत.

ती महिला मध्यप्रदेशातील

४० वर्षे वयाची ती महिला मूळची मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा तालुक्यातील एका गावची मूळ रहिवासी होती. ती एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहितीदेखील पोलिसांच्या चौकशीदरम्यान उघड झाली. ती ज्या व्यक्तीसोबत तळेगाव येथील वीटभट्टी परिसरात राहत होती, त्याच्यासोबतच वीटभट्टीवर काम करायची. सोमवारपासून ती अन् तो सोबत नसल्याची बाबही प्राथमिक चौकशीदरम्यान समोर आली. मात्र, खून करणारा आरोपी अद्याप गवसलेला नाही.

कोट

दगडाने ठेचून त्या महिलेची हत्या करण्यात आली. गुदद्वारात काड्या टोचण्यात आल्या. तळेगाव येथील एका मजुराने तिची ओळख पटविली. अज्ञाताविरुद्ध खून, बलात्कार व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

- केशव ठाकरे, ठाणेदार, शिरखेड

---------------

Web Title: Face crushed so as not to be identified!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.