करजगाव लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:56+5:302021-08-20T04:17:56+5:30
नीलेश भोकरे/ करजगाव : येथील शंकरराव विद्यालयातल लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी पाहायला मिळाली. डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. प्रत्येकजण टोकन ...
नीलेश भोकरे/ करजगाव : येथील शंकरराव विद्यालयातल लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी पाहायला मिळाली. डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. प्रत्येकजण टोकन मिळविण्याकरिता पहाटे ४ वाजतापासून रांगेत ताटकळताना निदर्शनास आले. त्यामुळे सकाळी टोकन वाटप करताना लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.
करजगाव येथे २०० डोस उपलब्ध होते. त्याकरिता नागरिकांना आरोग्य सेवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी ग्रूपवर व्हायरल केली. त्या ग्रुपवर गावातील बरेच नागरिक असल्यामुळे सदर हा मेसेज गावभर पसरला. त्यामुळे एकच गर्दी उसळली होती. परंतु नेहमी प्रमाणे व्यवस्था असताना सुद्धा तिथे प्रमाणापेक्षा जास्त नागरीक उपस्थित असल्यामुळे लसीकरण केंद्रावर टोकन वाटपाकरिता आलेले आरोग्य सेवक खोंडे व रामानंद देशमुख यांच्यासोबत काही नागरिकांनी टोकन वाटप करण्यावरून वाद केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. लसीकरण केंद्रावर कोणतेच गैरकृत्य घडू नये म्हणूच कर्मचाऱ्यांनी टोकन वाटप न करताच परत जाण्याचा निर्णय घेतला. सदर लसीकरण वेळी दोन पोलिस कर्मचारी हे लासीकरण केंद्रावर उपस्थित असावे, अशी विनंती शिरजगावचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना केली.