सोशल मीडियावर बनावट अकाऊंट, ९९ तक्रारी, तात्काळ घेतली जाते दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:55+5:302021-07-05T04:09:55+5:30
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट विविध तक्रारी , तात्काळ घेतली जातेय दखल शहर सायबर सेलचा वॉच, ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस ...
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट विविध तक्रारी , तात्काळ घेतली जातेय दखल
शहर सायबर सेलचा वॉच, ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश
अमरावती:/ संदीप मानकर
ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्युबसारख्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी कोणत्याही खात्यात फेक फोटो असल्याची तक्रार कुण्याही व्यक्तीकडून किंवा त्यांच्याशी संबधित इतर कोणत्याही व्यक्तीकडून येत असेल, तर तो फोटो २४ तासांत हटवावा लागेल. गत तीन वर्षांत शहरात सोशल मीडिया व इतर विविध प्रकारचे ॲप्स व सोशल मीडियावर आमिष दाखवून लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या ९९ तक्रारी प्राप्त झाले आहे. अशा प्रकरणाची तत्काळ दखल घेेतली जात असून, कारवाई केली जात आहे. त्यामुळे तक्राकर्त्यांनाही दिलासा मिळाला आहे.
हलली सोशल मीडियाचा भडीमार होत आहे. आबालवृद्ध सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. याच सोशल मीडियाचा वापर करून पैशांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. असे असताना माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रति असलेले अज्ञात आणि आतताईपणा सायबर गुन्हेगारीला आमंत्रण देत येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगलेले बरे. नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज असून, अशा सायबर गुन्हेगारांवर शहर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
बॉक्स:
कोरोनाकाळात वाढल्या तक्रारी
कोरोनाकाळात लॉकडाऊन झाल्याने सर्व जण घरात लॉक झाले होते. मात्र, याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला असून, अनेकांना गंडविल्याचेही समोर आले आहे. इतकेच नव्हे तर अनेकांचे तर सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून त्यांच्याकडून पैसे उकडण्याचेही प्रमाण वाढले होते. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीसह सोशल मीडियावरील तक्रारींचा पाऊस, पोलीस आयुक्तलायातील सायबर सेलमध्ये पडला. मात्र, पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली. तक्रारीची दखल घेऊन अनेकांना दिलासा देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
बॉक्स:
२४ तासांत घेतली जाते तक्रारींची दखल
सोशल मीडियावरून फसगत झाली किंवा बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी केल्याबाबतची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त होताच याची दखल घेतली जाते. जर प्रकरण अतिसंवेदनशील असेल, तर त्याची लगेच दखल घेवून त्याबाबात कारवाई करण्यासंदर्भात संबधित पोलीस ठाण्यांना सांगितले जाते. सोशल मीडियावरून फसवणूक व बनावट तयार करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी दाखल होतात. अशा प्रकरणात संबंधित तक्रारकर्यांचे खाते बंद करण्यात येते.
बॉक्स:
पोलिसांसाठी वेगळे पोर्टल
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केले असेल किंवा पैशाची मागणी केली असेल, ऑनलाईन फसवणुक केली असेल अशा प्रकरणांची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाल्यावर पोलिसांकडून अशा तक्रारीत संबधित पोलीस ठाण्यांकडे ई-मेल किंवा पोलिसांच्या पोर्टलवरून पाठविण्यात येतात. तक्रारकर्त्यांनी ऑनलाईन तक्रार केली असल्यास त्याची दखल तात्काळ घेतली जाते. संवेदनशील प्रकरणांची दखल तत्काळ घेऊन ती तक्रार संबधित पोलीस ठाण्यात वरीष्ठांच्या सूचनेनुसार पाठविली जाते. ज्या व्यक्तीची फसवणूक झाली किंवा ज्या व्यक्तीचे बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी करण्यात आल्याची तक्रार थेट सायबर सेलकडे प्राप्त झाल्यावर त्याची योग्य दखल घेत पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या सुचनेनुसार, सायबर पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनात सदर तक्रार संबधीत पोलीस ठाण्याकडे पाठवून तत्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या जातात.
१) जर तुमचे फेसबुक अकाऊंट कुणी हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते पुन्हा तुमच्या नियंत्रणाखाली आणणे सोपे आहे. फेसबुक डॉट कॉम/ हॅक या लिंकवर जाणे तेथे बटन दिसेल माय अकाऊंट हॅज बीन कॉम्प्रमाईज्ड असे लिहिले असेल. त्यावर क्लिक करा. नंतर एक स्क्रीनसमोर येईल. येथे पासवर्ड देऊ नका. त्यानंतर फॉरगेट यूजर पासवर्डवर क्लिक कारा.
२) जी स्क्रीन येईल त्यावर युजर नेम अथवा ई-मेल किंवा तुमच्या अकाऊंटशी जोडलेला मोबाईल क्रमांक या पैकी एकाची माहिती द्या. जर हॅक करणाऱ्याने ई-मेल आणि मोबाईल क्रमांक बदलला असेल, तर तुम्ही युजर नेम टाका. कारण हॅकर यूजर नेम बदलूच शकत नाही.
३) त्यानंतर फेसबूक तुमच्या अकाऊंटला सर्च करून समोर आणेल. आता पासवर्डच्या जागी हॅक करण्यापूर्वीचा किंवा त्या आधीचा पासवर्ड टाकण्याचा पर्याय उपलब्ध दिल्या जाईल.
४) आता स्क्रीनवर एकापेक्षा अधिक ई-मेलचे पर्याय दिसून येतील. त्यानंतर त्यापैकी कोणत्या ई-मेल आईडीचा वापर करून तुम्ही अकाऊंट सुरू ठेवणार आहात, याविषयी विचारणा केली जाईल. त्यापैकी ईमेल निवडल्यानंतर अन्य ई-मेलमधून तुमचे फेसबुक अकाऊंट लॉग-ईन करण्याची सुविधा काढून घेतली जाईल. त्यानंतर तुम्ही निवडलेला एक ईमेल आणि नव्या पासवर्डच्या मदतीने फेसबूक पुन्हा कार्यरत ठेवू शकता.
सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी
२०१९
बनावट अकाऊंट व इतर फसवणूक -२२
इतर -११
२०२०
बनावट अकाऊंट व इतर फसवणूक -६७
ईतर-१३
२०२१
बनावट अकाऊंट व इतर फसवणूक १०
इतर -००