सेमाडोहच्या वसतिगृहात बनावट देशी-विदेशी दारूचा कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:06 AM2021-01-24T04:06:45+5:302021-01-24T04:06:45+5:30

फोटो पी २३ सेमाडोह फोल्डर बाहेरच्या पानासाठी चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील बनावट दारूचा कारखाना ...

Fake domestic-foreign liquor factory in Semadoh hostel | सेमाडोहच्या वसतिगृहात बनावट देशी-विदेशी दारूचा कारखाना

सेमाडोहच्या वसतिगृहात बनावट देशी-विदेशी दारूचा कारखाना

Next

फोटो पी २३ सेमाडोह फोल्डर बाहेरच्या पानासाठी

चिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील बनावट दारूचा कारखाना ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. १८ लाख रुपयांच्या मुद्देमालासह १० आरोपींना अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री ८ ते ११ वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींमध्ये मध्यप्रदेश, अमरावती व स्थानिक एकाचा समावेश आहे. कोरोनामुळे वसतिगृहात मुले नसल्याने तेथे हा गोरखधंदा चालविला जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

चंदन गागनदास नागवानी (३०, रा. कृष्णानगर, अमरावती), प्रकाश उध्दवदास रावलानी (३८, रा. रामपुरी कॅम्प अमरावती), गोलू बाबू मुंडे (३७, रा.सेमाडोह), जयेश देवीसिंग सोनिया (२२, रा. आरपीएफ कॉलनी रतलाम), संजय समरत मालविय (२१, रा. सितला माता मंदिरजवळ, रेल नगर, रतलाम), आकाश राधेश्याम सिंदल (१८, ब्लॉक टापरी बिरला ग्राम नागदा जि. उज्जैन, मध्यप्रदेश), नरेंद भेरुलाल चव्हाण (२१, रा.खातवाकता जि.रतलाम), प्रकाश रामलाल मालविय (३१, रा. घर नं ४७२, वाॅर्ड नं १९, खारवाकला, रतलाम), सुनित दुर्गाशंकर चव्हाण (२५, जी ब्लॉक ६४, बिरला ग्राम नागदा जि.उज्जैन), शाकीर खाँ शकुर खाँ (३६, रा. घर नं १३६), वाॅर्ड नं ४, सारवाकला जि. रतलाम) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना सेमाडोह येथे बनावट देशी विदेशी दारू तयार करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे जय महाकाली मुलींचे शासकीय वसतिगृह सेमाडोह येथे धाड टाकण्यात आली. त्या वसतिगृहात काही इसम देशी-विदेशी दारू तयार करीत असताना मिळून आले.

बनावट दारू निर्मितीचा गोरखधंदा

सदर वसतिगृहाची बारकाईने पाहणी केली असता, बनावट दारू बॉटलींग करण्याकरिता प्रत्येकी २०० लिटर क्षमतेचे पाच प्लास्टिक ड्रममध्ये १००० लिटर अल्कोहोल, २० लिटर पाणीमिश्रित अल्कोहोल, मिनरल वाटरच्या ३६ कॅन, देशी दारुच्या काचेच्या ६३२० नग रिकाम्या शिशा, आयबी कंपनीच्या १८० मिलीच्या काचेच्या ६२० रिकाम्या शिशा, लोखंडी पाना व एलबो, दोन प्लॉस्टो कंपनीच्या टाक्या, ईलेक्ट्रिक मोटार, काचेचे हायड्रोमिटर व थर्मामिटर, आयबी व एमडी नं १ कंपनीचे प्लास्टिक बुच झाकण १११० नग, ७ लिटर व्हिस्की फ्लेवर रसायन, ट्रे, स्टीलचे एम.पी ०५ डीए ०४५२ व एमएच २७ बीझेड ०८१५ या दोन चारचाकी, १२ मोबाईल व नगदी २९८० रुपये असा एकुण १७ लाख ६० हजार ३४० रुपयांचा माल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. सर्व १० आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरिता चिखलदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, एपीआय अजय आकरे, पीएसआय विजय गराड, चिखलदऱ्याचे ठाणेदार आकाश शिंदे, एपीआय शहाजी रुपनर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

---------

Web Title: Fake domestic-foreign liquor factory in Semadoh hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.