चार लाखांच्या मदतीचा ‘तो’ मेसेज बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:32+5:302021-09-02T04:27:32+5:30
असाईनमेंट पान २ ची लिड प्रदीप भाकरे अमरावती : कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांंना चार लाखांची भरपाई मिळणार असल्याचा बनावट ...
असाईनमेंट
पान २ ची लिड
प्रदीप भाकरे
अमरावती : कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांंना चार लाखांची भरपाई मिळणार असल्याचा बनावट मेसेज जिल्ह्यात व्हायरल झाला आहे. त्यामुळे खरेच तसे आहे का, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा होत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, अशी कुठलीही शासकीय योजना नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९६ हजार ६९ वर पोहोचली आहे, तर कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १५६३ अशी आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे ४ लाख रुपये शासकीय मदतीचा बनावट संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत मोठी भर पडली आहे.
//////////
आपत्ती व्यवस्थापनाकडे आलेत पाच अर्ज
चार लाखांच्या मदतीचा मॅसेज व्हायरल झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण पाच अर्ज आले आहेत. आपल्या कुटुंबातील या सदस्याचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंब पोरके झाले. त्यामुळे तातडीने मदत देण्यात यावी, असे त्या अर्जांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
///////////
या अर्जांचे काय करणार?
कोरोनाने मृत्यू झालेल्या संबंधिताच्या कुटुंबाला मदत देण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. जिल्हा प्रशासन आलेल्या अर्जदारांचा अर्ज घेत असले तरी अशी कुठलीही योजना नाही, असे समुपदेशनदेखील करीत आहेत.
//////////////
अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही
‘ कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांची भरपाई मिळणार आहे, असा जो मेसेज व्हायरल होत आहे, तो बनावट आहे. शासनाची अशी कुठलीही योजना नाही. लोकांनी अर्ज करू नयेत.
- नितीन व्यवहारे,
निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती