रेल्वे टीसीच्या नौकरीची बनावट ऑर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:10+5:302021-09-16T04:17:10+5:30

सातुर्णा साईनगर भागातील एका परिचारिका महिलेची एका सरकारी दवाखान्यात महिला आरोपी व सचीन टापरेशी ओळख झाली. ती ओळख बर्यापैकी ...

Fake order of Railway TC job | रेल्वे टीसीच्या नौकरीची बनावट ऑर्डर

रेल्वे टीसीच्या नौकरीची बनावट ऑर्डर

Next

सातुर्णा साईनगर भागातील एका परिचारिका महिलेची एका सरकारी दवाखान्यात महिला आरोपी व सचीन टापरेशी ओळख झाली. ती ओळख बर्यापैकी जुनी झाल्यानंतर आपली रेल्वे व अन्य खात्यात प्रचंड मोठी ओळख असून, परिक्षा व मुलाखतीशिवाय आपण नाैकरी लावून देण्याची बतावणी त्यांनी केली. त्यामुळे परिचारिका महिलेने आपल्या बहिणीच्या मुलासाठी नौकरी बघ, असे सांगितले. त्यावर आरोपींनी त्याला रेल्वे विभागात टीसी पदावर लावून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी ३ लाख रुपये देण्याचीे ठरले. तीन लाख रुपये दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला रेल्वेची खोटी ऑर्डर दिली. मात्र, ती ऑर्डर खोटी निघाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परिचारिका महिलेने ती रक्कम परत मागितली. त्यानंतरच्या काळात आरोपींनी २ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित १ लाख रुपयांसाठी टाळाटाळ चालविली. अलिकडे आरोपींनी फोन रिसिव्ह करणे देखील बंद केले. त्यामुळे परिचारिका महिलेने १४ सप्टेंबर रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास राजापेठचे उपनिरिक्षक किसन मापारी हे करीत आहेत.

Web Title: Fake order of Railway TC job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.