हरभऱ्याच्या भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:42 PM2018-04-14T22:42:18+5:302018-04-14T22:42:18+5:30
शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, स्थानिक बाजारात व्यापारी मात्र हमीपेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने खरेदी करीत आहेत. नाफेडच्या १२ ही केंद्रांवर खरेदीची मंदगती व गोडाऊन किंवा ग्रेडर उपलब्ध नसल्याच्या कारणांमुळे शेतकºयांची लूट होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, स्थानिक बाजारात व्यापारी मात्र हमीपेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने खरेदी करीत आहेत. नाफेडच्या १२ ही केंद्रांवर खरेदीची मंदगती व गोडाऊन किंवा ग्रेडर उपलब्ध नसल्याच्या कारणांमुळे शेतकºयांची लूट होत आहे
मागील रबी हंगामात जिल्ह्यात साधारणपणे १ लाख ५ हजार हेक्टरमध्ये हरभऱ्यांची पेरणी झाली. फेब्रुवारी अखेरपासून सवंगणी व मळणीचा हंगाम सुरू झाला. शासनाने १५ एप्रिलनंतर जिल्ह्यात १२ केंद्रावर ४४०० या हमीभावाने हरभऱ्यांची खरेदी सुरू केली. मात्र, सुरुवातीपासूनच खरेदीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत १२ हजार ३५० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात केंद्रावर फक्त ३४२३ शेतकºयांच्या ५७ हजार ५६७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.
बाजार समित्यांमध्ये शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने खरेदी करता येत नाही, असे शासनादेश आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये हा नियम गुंडाळून ठेवला आहे. विशेष म्हणजे, सहकार विभागदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे व्यापाºयांचे फावते. त्यामुळेच शेतमाल बेभाव खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.
केंद्र सुरू झाल्यानंतर आतापर्यंतची खरेदी
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर दीड महिन्यात ३४२३ शेतकऱ्यांकडून ५७ हजार ५६७ क्विंटल खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर ३३० शेतकऱ्यांकडून ४६११ क्विंटल, अमरावती १३ शेतकऱ्यांकडून २५२, अंजनगाव सुर्जी १३८ शेतकऱ्यांकडून ३३५८, चांदूर बाजार ३१५ शेतकºयांकडून ६१२९, चांदूर रेल्वे १४२ शेतकऱ्यांकडून २,१९३, दर्यापूर १११७ शेतकऱ्यांकडून २० हजार २९२, धारणी ६३ शेतकऱ्यांकडून ११०९, नांदगाव खंडेश्वर १४४ शेतकऱ्यांकडून २,३५०, धामणगाव रेल्वे ९५१ शेतकऱ्यांकडून १३ हजार ९४३, मोर्शी ८२ शेतकºयांकडून १३७५, वरूड केंद्रावर ७५ शेतकऱ्यांकडून ११०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.