विदर्भाच्या नंदनवनात शेकडो फूट उंचावरून कोसळू लागले धबधबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:29 PM2018-07-29T22:29:20+5:302018-07-29T22:30:08+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळखळू लागले आहे. गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत असल्याने आल्हाददायक वातावरण परमोच्च बिंदूवर आल्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे.

Falls in the Paradise in Vidarbha | विदर्भाच्या नंदनवनात शेकडो फूट उंचावरून कोसळू लागले धबधबे

विदर्भाच्या नंदनवनात शेकडो फूट उंचावरून कोसळू लागले धबधबे

Next
ठळक मुद्देपाऊस हजारी गाठणार : मेळघाटचा दिलखेच नजारा खुणावतोय
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले खळखळू लागले आहे. गगनभेदी उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद पर्यटक घेत असल्याने आल्हाददायक वातावरण परमोच्च बिंदूवर आल्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे.
चिखलदरा पर्यटन स्थळावर एकंदर ४० पॉइंट असून, पर्यटकांना आकर्षित करणारा असा नजारा आहे दाट धुके तर कधी मुसळधार कोसळणा?्या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत हिरव्याकच्च पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणारे धबधबे चिखलदरा सह परिसरातील दृश्य पर्यटकांना मोहात पाडणारे ठरले आहे शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत आहेत येथील भीमकुंड पॉइंट्स देवी पॉइंट, जत्राडोह, सेमाडोह येथील जवाहर कुंड, पंचबोल पॉईंट यासह मेळघाटच्या नागमोडी घाट वळणावर ठिकठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे पर्यटनाच्या नजारा चार चांद लावणारे ठरले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या सेमाडोह येथील नजरा पर्यटकांची पहिली पसंत ठरू लागला आहे. देवी पॉइंटवरून उगमस्थान असलेली चंद्रभागा, सिपना नद्या खळखळून वाहू लागले लागल्या आहेत.
दमदार पावसाने पर्यटनाला बहार
मागील काही वर्षांत पर्यटन स्थळासह मेळघाटात पावसाने दांडी मारल्याने बोडके जंगल वृक्ष रानवेली आटलेले धबधबे कोरडे नदी-नाल्यांचे दर्शन पर्यटकांना घडले. मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पर्यटनात प्राण फुंकले आहे. तब्बल २५ दिवस पावसाने येथे दररोज हजेरी लावली
शासन स्तरावर उपेक्षितच
चिखलदरा पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे फूट उंचावर असून इंग्रज राजवटीत कॅप्टन रॉबिन्सन यांनी याचा शोध लावला होता. हवापालट आणि आरामासाठी इंग्रज येथे येत असत. विदर्भात एकमेव या पर्यटन स्थळावर विकासाच्या गप्पा झाल्या. मात्र प्रत्येक शासनाने उपेक्षाच केली.

Web Title: Falls in the Paradise in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.